एक्स्प्लोर

Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडला दिलासा, सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही, न्यायालयाचा आदेश

Sushil Karad : सुशील कराडने मॅनेंजरच्या घरात घुसून बंदुतीचा धाक दाखवून दोन बल्कर, दोन कार, सोने आणि प्लॉटचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. 

सोलापूर : एकीकडे वाल्मिक कराडभोवतीचा फास आवळला जात असताना दुसरीकडे त्याच्या मुलाला मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. सुशील कराडवर सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही असं सांगत बीड न्यायालयात त्याच्या विरोधात दाद मागावी असा आदेश सोलापूर न्यायालयाने दिला आहे. वाल्मिक कराडच्या मॅनेंजरच्या घरात घुसून त्याला मारहाण करणे, त्याच्या अल्पवयीन मुलीहा मारहाण करणे तसेच बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर, दोन कार आणि सोने नेल्याचा आरोप करण्यात आला होता. 

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्या विरोधात पीडित महिलेने सोलापुरात फिर्याद दाखल केली होती. दाखल केलेल्या खासगी फिर्यादनुसार संपूर्ण घटनाक्रम हा बीड जिल्ह्यातला असल्याने  पीडित महिलेने बीड जिल्हा न्यायालयात दाद मागण्याचे सोलापूर न्यायालयाने आदेश दिले. 

पीडित महिलेच्या मागणीनुसार सुशील कराड विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही. संपूर्ण घटनाक्रम हा बीड जिल्ह्यातील असल्याने सोलापूरच्या हद्दीत गुन्हा दाखल करता येणार नाही असे कोर्टाचे आदेश आहेत. 

काय आहे प्रकरण? 

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने मॅनेजरच्या घरात घुसून त्याला मारहाण करत त्याच्या अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर, दोन कार तसेच सोने आणि प्लॉट बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 

सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी पीडित महिलेने सोलापूर न्यायालयाकडे केली होती.

मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील सोलापूर पोलीस आयुक्त आणि  बीड पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती. 

वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ

वाल्मिक कराडसह सर्वच आरोपींच्या अडचणी वाढणार आहेत. या कराड गँगचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. ज्या दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्या दिवशीचाच म्हणजेच 29 नोव्हेंबरचा, केजमधील विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये कराडसह संतोष देशमुखांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्याचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणात निलंबित झालेला पीएसआय राजेश पाटीलदेखील वाल्मिक कराडला भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी या निलंबित पीआयलादेखील सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. 

ही बातमी वाचा: 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget