एक्स्प्लोर

माळशिरसमध्ये वेगळाच पॅटर्न, मारकडवाडीतील ग्रामस्थ पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यावर ठाम, गावातील विरोधकांचा मतदानावर बहिष्कार

Uttam Jankar VS Ram Satpute, सोलापूर : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थ बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास ठाम आहेत.

Uttam Jankar VS Ram Satpute, सोलापूर : ईव्हीएम मशीनवर शंका घेत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळून लावल्यानंतरही आता आमदार उत्तम जानकर यांच्या गटाचे ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत तीन डिसेंबर रोजी मतदान घेण्यावर ठाम आहेत . यासाठी त्यांनी गावात प्रचाराला ही सुरुवात केली असून घरोघरी जाऊन मतपत्रिका दाखवत आपण वीस तारखेला ज्याला मतदान केले होते त्यालाच मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांनी कितीही प्रेशर आणलं तरी आम्ही लोक वर्गणीतून ही निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर पार पाडणार अशी जानकर गटाची भूमिका आहे. 

मात्र आता प्रशासनाने मागणी फेटाळून लावल्यानंतर गावातील दुसरा विरोधी गट आक्रमक झाला असून गावातील जानकर गटाच्या चार पुढार्‍यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता हा मतदानाचा निर्णय घेतला आहे. आम्ही यात सहभागी होणार नसून आमचा या मतदानावर बहिष्कार असल्याची भूमिका घेतल्याने या प्रकरणाला नवीन ट्वीस्ट मिळाला आहे . या मतदानामुळे गावातील वातावरण खराब झाल्यास किंवा गोरगरिबांना त्रास झाल्यास हे चार पुढारी जबाबदार असतील, असा इशाराही विरोधी गटाने दिला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने मतदानाची मागणी फेटाळून लावली असली तरी गावात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस प्रशासनावर ताण वाढू शकणार आहे. 

माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी ग्रामस्थांची मागणी फेटाळून लावली होती. आता निवडणूक प्रक्रिया संपली असून ग्रामस्थांनी किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रियेत मतदान व मतमोजणी सुरू असताना कोणताही आक्षेप घेतला नसल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे आता होत असलेली ही चाचणी निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर असून बॅलेट वर होणारे मतदान कायद्याला धरून नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी सांगितले आहे. 

येत्या मंगळवारी म्हणजे 3 डिसेंबरला गावात मतदान होणार असून गावात एकूण तीन मतदान केंद्र होती. यात आता हे मतदान प्रक्रिया माध्यमांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणार असल्याची गावकऱ्यांची भूमिका आहे. त्यानुसार मतदानासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापून तयार झाल्या असून आता यास प्रशासनाचा विरोध असल्याने नेमकी किती ग्रामस्थ मतदान करतात हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

रक्तानं पत्र लिहल्याने कुणी मुख्यमंत्री होत नसतं, CM पदासाठी आमचं नाव ठरलंय; दानवेंनी स्पष्टच सांगितलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget