एक्स्प्लोर

Solapur Ujani Dam: उजनी धरणातून 80 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग, चंद्रभागेत पाण्याचा प्रवाह वाढणार, पंढरपूरमध्ये सतर्कतेच्या सूचना

Solapur news: उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने भीमा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणातील पाण्याची पातळी 96.70% वर पोहोचली होती.

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे उजनी धरण भरले आहे. गेल्या काही तासांमध्ये उजनी धरणातून भीमा नदीत सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे पंढरपूरसह भीमा नदीच्या (Bhima River) काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उजनी धरणातून (Ujani Dam) भीमा नदीत 80 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. उजनी धरणात सध्या येणाऱ्या पाण्याचा प्रवाह 1 लाख 60 हजार क्युसेक इतका आहे. त्यामुळे उजनी धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून काल रात्री 12 वाजेपर्यंत 60 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. सकाळी सहा वाजता उजनी धरणातील पाण्याची पातळी 96.70% वर पोहोचली होती.

उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग 80 हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आल्याने पंढरपूरचा पुराचा धोका वाढला आहे. आज दुपारी चंद्रभागा पात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्याप्रमाणावर वाढेल, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने पंढरपूरमध्ये (Pandharpur) प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीर धरणाचा विसर्ग 32459 क्युसेख इतका कमी झाला असला तरी उजनी व वीर धरणाचा एकत्रित विसर्ग चंद्रभागेत (Chandrabhaga River) साधारण सव्वा लाख ते दीड लाख इतका असेल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन चंद्रभागा काठावरील अंबाबाई पटांगण व व्यासा नारायण वसाहतीतील 500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

जायकवाडी धरणात पुढील आठ महिने पुरेल इतका पाणीसाठा

जायकवाडी धरणात 24 हजार 697 क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे आता जायकवाडी धरणात 13.10 टक्के पाणीसाठा  जमा झाला आहे. आज दुपारनंतर जायकवाडीतील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.  हा पाणीसाठी पुढील आठ महिने पुरु शकतो. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

उजनी धरण भरल्यामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण 100 टक्के भरल्याने आता सोलापूर जिल्ह्यासह , नगर , उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागाचा पिण्याच्या  शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे . उजनी धरणाची एकूण क्षमता 117.23 TMC  असून  यात  जिवंत साठ्यात 53.57 TMC तर मृत साठ्यात 63.66 TMC पाणी साठवता येते. यावर्षी धरणाने नीचांकी पातळी गटात वजा 60 टक्के एवढी पातळी गाठली होती. मात्र, जून महिन्यापासूनच पुणे जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसाने आज 4 ऑगस्ट रोजी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. अजूनही उजनी पाणलोट क्षेत्रात 2 महिने पावसाचा कालावधी असताना ऑगस्टमध्येच पूरस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येते. उजनी धरणात पूर नियंत्रणासाठी 110 टक्के पाणी साठविण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने 123 TMC पर्यंत पाणी धरणात साठवता येवू शकते. मात्र, सध्या ज्या प्रमाणात उजनी धरणात पाणी येऊ लागले आहे हे पाहता प्रशासनाने आजपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता . गेल्यावर्षी उजनी धरण या महिन्यात साधारण 5 टक्के भरले होते, मात्र यंदा उजनीतील पाणीसाठा 96.70% वर पोहोचला आहे.

आणखी वाचा

उजनीची शंभरीकडे वाटचाल, बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद, मागील वर्षीची सर्वोच्च पातळी ओलांडली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 10 March 2025Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget