एक्स्प्लोर

Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले

Bhose Pattern Statue : सोलापूरमधील मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत पुतळे हटवले असून आता कायदेशीर प्रक्रियेनंतर ते पुन्हा स्थापन करण्यात येणार आहेत. 

सोलापूर : जिल्ह्यात अनाधिकृत महापुरुषांच्या पुतळ्यांवरून निर्माण होणाऱ्या तणावावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने अवलंबलेला ‘भोसे पॅटर्न’ आता यशस्वी ठरताना दिसत आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसेनंतर माढा तालुक्यातील मोडलिंब येथेही ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेत अनाधिकृत पुतळे हटवले आहेत. या पुतळ्यांना नियमानुसार परवानगी मिळाल्यानंतर ते पुन्हा एकदा वाजत गाजत स्थापन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

Solapur Statue Issue : प्रशासनाचा ‘भोसे पॅटर्न’ यशस्वी

सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव खेलोबा येथे झालेल्या वादानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी बैठक घेत प्रशासनाला विशेष मार्गदर्शन केले होते. अनाधिकृत पुतळ्यांवर थेट कारवाई करण्याऐवजी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.

या पद्धतीनुसार, आधी ग्रामस्थांनी अनधिकृत पुतळे स्थलांतरित करायचे आणि त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने आवश्यक परवानग्या घेऊन पुन्हा विधिवत स्थापना करायची, असे मॉडेल राबवण्यात येत आहे.

Bhose Pattern Impact : भोसेनंतर मोडलिंबमध्येही प्रतिसाद

या मॉडेलचा पहिला सकारात्मक परिणाम पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे दिसून आला. त्यानंतर आता मोडलिंब गावातही याची पुनरावृत्ती झाली आहे. मोडलिंबमध्ये यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा बसवण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा पुतळाही शेजारी बसवण्यात आला. हे दोन्ही पुतळे अनधिकृत असल्याने संभाव्य तणाव निर्माण होण्याची शक्यता होती.

Solapur Administration Action : संवादातून सुटला तणाव

जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने ग्रामस्थांशी संवाद साधला. पुतळ्यांना कायदेशीर परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी स्वतः पुढे येत दोन्ही पुतळे हटवले. यामुळे गावातील संभाव्य तणाव पूर्णपणे निवळला असून शांततेचा मार्ग निवडला गेल्याचे चित्र आहे.

Future Plan : परवानगी घेऊनच होणार स्थापना

आता पुढील एक ते दोन महिन्यांत प्रशासनाच्या मदतीने आवश्यक परवानग्या मिळवून पुन्हा विधिवत आणि वाजतगाजत पुतळ्यांची स्थापना केली जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेला हा ‘भोसे पॅटर्न’ राज्यातील इतर भागांसाठीही आदर्श ठरू शकतो, असं मत व्यक्त होत आहे. या पद्धतीमुळे भविष्यातील सामाजिक तणाव टाळण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रशासनाचं मत आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Solapur Crime News: पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बायकोला आईनं दिली ऑफर; 39 लाखांची मागणी अन् आरोपातून मुक्तता..., सोलापुरात नेमकं काय घडलं?
राज्यात दुष्काळी परिस्थिती, आंदोलनाची दखल घेण्याची गरज नाही, विरोधक वैफल्यग्रस्त झालेत, निलम गोऱ्हेंचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंवरही टीका 
राज्यात दुष्काळी परिस्थिती, आंदोलनाची दखल घेण्याची गरज नाही, विरोधक वैफल्यग्रस्त झालेत, निलम गोऱ्हेंचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंवरही टीका 
'कपडे काढा आणि घागरीने गावाला पाणी द्या!' उत्तम जानकरांचा वीज वितरण अधिकाऱ्यांवर संताप; नेमकं झालं काय?
'कपडे काढा आणि घागरीने गावाला पाणी द्या!' उत्तम जानकरांचा वीज वितरण अधिकाऱ्यांवर संताप; नेमकं झालं काय?

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget