फिरण्यासाठी चारचाकी घेतली, पण पैसेच दिले नाही; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल
Solapur Crime News : सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे याच्यावर आर्थिक फसवणूक आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
![फिरण्यासाठी चारचाकी घेतली, पण पैसेच दिले नाही; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल Solapur Shinde Group district head Manish Kalje against cheating case registered In Solapur Police marathi news फिरण्यासाठी चारचाकी घेतली, पण पैसेच दिले नाही; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/23/9ce6bb54bc98773120e27f6adc6d474f1708659658038737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Solapur Crime News : सोलापूरच्या शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. सोलापूर (Solapur) शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे (Manish Kalje) याच्यावर आर्थिक फसवणूक (Fraud) आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कार खरेदी व्यवहारात फसवणूक करत दमदाटी केल्याप्रकरणी भादवि 420, 406, 506 आणि 34 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, आरोप-प्रत्यारोप होतांना पाहायला मिळत आहे. दत्तात्रय मुनगा पाटील (वय-39 वर्षे, सृष्टी नगर, अक्कलकोट नगर, सोलापूर) या व्यावसायिकानं दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय मुनगा पाटील यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी मनिष काळजे यांनी चार चाकी वाहनाचा सौदा केला होता. यावेळी एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन काळजे यांनी वाहन नेले होते. मात्र, उर्वरित तीन लाख रुपये अद्याप मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत दत्तात्रय पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली होती. त्यामुळे शिवेसना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्यासह आकाश मुदगल या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव...
पोलिसांत विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा जुनी चारचाकी वाहने विक्रीचा व्यवसाय असून, ते पुणे, मुंबई येथून चारचाकी वाहने विकत आणून सोलापूर शहरात विकत असतात. दरम्यान, 4 जानेवारी रोजी विठ्ठल पाटील यांचे ओळखीचे आकाश मुदगल यांनी मनिष निकाळजे यांना चारचाकी गाडी घ्यायची असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पाटील यांनी त्यांना काही चारचाकी गाड्या दाखवल्या. यातील एक गाडी निकाळजे यांनी पसंद केली. यावेळी पाटील यांनी गाडीची किमंत सांगितली आणि त्यांचा चार लाखात सौदा ठरला. दरम्यान, यावेळी निकाळजे यांनी एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन उर्वरित तीन लाखाची रक्कम दोन दिवसांत देण्याचं सांगितले. मात्र, अनेकदा पैसे मागून देखील निकाळजे यांच्याकडून रक्कम येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची विठ्ठल पाटील यांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.
शिंदे गटाचा फसवण्याचा रॅकेट राज्यभर
शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून टीका करण्यात येत आहे."आरोपी सोबत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो संजय राऊत प्रसिद्ध करत होते, मात्र, एकनाथ शिंदेचे पदाधिकारी देखील आता आरोपी आहेत हे यातून दिसते. मुख्यमंत्री यांच्यासोबत फोटो काढून लोकांची फसवणूक करण्याचे आणि वेठीस धरण्याचे काम शिंदे गटाचे पदाधिकारी करतायत. लोकांना फसवण्याचे रॅकेट शिंदे गटाचे पदाधिकारी राज्यभर करत असावेत, लोकांनी आता यांच्यापासून सावध राहण्याची गरज असल्याची टीका ठाकरे गटाचे सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)