एक्स्प्लोर
Solapur Crime News : सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई! 564 किलो गांजा हस्तगत, तब्बल 1 कोटी 36 लाखांचा मुद्देमाल जप्त
Solapur Ganja Seized : मोहोळ येथील एमडी ड्रग्स प्रकरणातील टोळीचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही माहिती दिली आहे.
Solapur News : सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अंमली पदार्थच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. या दोन कारवायामध्ये पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. ओदिसा आणि आंध्रप्रदेश या राज्यातून महाराष्ट्रात गांजा तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 564 किलो इतका गांजा जप्त केला आहे. सोलापूर तालुका आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे एक कोटी 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई!
ओदिसा, आंध्रप्रदेश या राज्यातून गांजा या अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 65 वरून होत असते. याबाबत गोपनीय माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. 19 फेब्रुवारी रोजी सोलापूर तालुका हद्दीतून एका चार चाकी वाहनातून दोन व्यक्ती आंध्रप्रदेशमधून गांजा घेऊन बारामतीकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
564 किलो गांजा हस्तगत
या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सपोनि धनंजय पोरे आणि पोसई सुरज निंबाळकर आणि पथकाने सोलापूर ते पुणे जाणारे रोडवर कोंडी गावच्या हद्दीत सापळा रचला. यावेळी संशयित वाहनाचा पाठलाग करुन गाडी थांबवली. यामध्ये दोन व्यक्ती पिकअप गाडीमधून 459 किलो 340 ग्रॅम गांजा घेऊन जात असल्याचे आढळून आले. या प्रकरणी अल्ताफ युनुस इनामदार, जमीर इब्राहिम शेख या दोन आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 1 कोटी 46 हजार 900 रुपयांचा अवैध गांजा जप्त करण्यात आला आहे.
तब्बल 1 कोटी 36 लाखांचा मुद्देमाल जप्त
टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील मोडनिंब येथील मोडनिंब ते जाधववाडी रस्त्यावरुन दोन चार चाकी वाहनामधुन काही इसम गांजा हा अंमली पदार्थ घेवुन जाणार आहेत. अशी माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून मोडनिंब ते जाधववाडी रस्त्यावर सापळा रचुन पाठलाग करून दोन चार चाकी वाहने थांबवून चालकांना ताब्यात घेतलं. या गाड्यात पोलिसांना 105 किलो 380 ग्राम गांजा आढळून आला. एकूण 36 लाख 36 हजरांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी चार आरोपीना अटक केलीय. कदीर आसीफ पठाण, प्रकाश संतोष बारटक्के, ऋषीकेश उर्फ बापु देवानंद शिंदे, संतोष तुकाराम कदम अशी अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत.
एमडी ड्रग्स प्रकरणातील टोळीचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात
ऑक्टोबर महिन्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोहोळ तालुक्यातून चालणाऱ्या ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. सलग झालेल्या कारवायामध्ये ग्रामीण पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा एमडी ड्रग्स आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी ड्रग्स निर्मिती करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सुत्रधारला कर्नाटकातल्या कलबुर्गी येथुन जेरबंद केले आहे तर, त्याच्या साथीदारास हैद्राबाद येथुन अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 13 आरोपीना अटक केली आहे.
कर्नाटक, तमिळनाडु, आंध्रप्रदेश, राजस्थान भागात रॅकेट
या टोळीचा मुख्य सूत्रधार असलेला फय्याज शेख याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. शेख हा कर्नाटक, तमिळनाडु, आंध्रप्रदेश, राजस्थान या भागातील अशा प्रकारच्या गुन्हयाचा मुख्य सुत्रधार असुन याच भागात तो आपले अस्तित्व लपवुन राहत होता. तसेच आपली राहण्याची ठिकाणे सतत बदलत होता. त्यामुळे त्याचा सुगावा लागेपर्यंत पळून जाण्यात यशस्वी होता. 14 फेब्रुवारी रोजी हा आरोपी कर्नाटकतील कलबुर्गी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांची पथके कलबुर्गी येथे गेली आणि एका हॉटेलमध्ये त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तरी त्याच्या साथीदारास हैद्राबाद येथून अटक करण्यात आली.
बंद असलेले कारखान्यात एमडी ड्रग्सची निर्मिती
"आरोपी फय्याज शेख हा दुसरी नापास आहे. मात्र त्याला विविध रसायनांचे तांत्रिक ज्ञान मोठ्या प्रमाणात आहे. त्याच आधारे तो वेगवेगळ्या राज्यात ड्रग्सचे रॅकेट चालवत होता. प्रामुख्याने एमआयडीसीमध्ये बंद असलेले कारखान्यात एमडी ड्रग्सची निर्मिती केली जातं होती. फय्याज शेखच्या विरोधात सोलापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल असून काही दिवसापूर्वीच तो केरळ येथील तुरुंगातून सुटला आहे." अशी माहिती पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
मुंबई
बॉलीवूड
Advertisement