(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोलापुरात पुन्हा दिसला दुर्मिळ माळढोक पक्षी, नान्नज अभयारण्यातील गणनेत आढळले 14 प्रकारचे प्राणी-पक्षी
Solapur : सोलापूरची (Solapur) ओळख असलेला माळढोक पक्षी नान्नज अभयारण्यात पुन्हा आढळून आला आहे. अत्यंत दुर्मिळ असलेल्या माळढोक (Maldhok) यंदाच्या वर्षी दिसून आल्याने पर्यावरणप्रेमीकडून आनंद व्यक्त केला जातोय.
Solapur : सोलापूरची (Solapur) ओळख असलेला माळढोक पक्षी नान्नज अभयारण्यात पुन्हा आढळून आला आहे. अत्यंत दुर्मिळ असलेल्या माळढोक (Maldhok) यंदाच्या वर्षी दिसून आल्याने पर्यावरणप्रेमीकडून आनंद व्यक्त केला जातोय. दरवर्षी बुद्धपौर्णिमेला नान्नज (Nannaj) अभयारण्यात वन्य प्राण्यांची गणना केली जाते. यंदाच्या वर्षीच्या गणनेत माळढोक सोबतच कुदळ्या पक्षी दिसला असून नीलगायींची संख्येतही वाढ झाली आहे.
मागील वर्षीच्या गणनेत 4 नीलगायी आढळून आल्या होत्या
मादी माळढोक पक्षीसह 21 कुदळ्या पक्षी दिसून आले. मागील वर्षीच्या गणनेत 4 नीलगायी आढळून आल्या होत्या, त्यात आता वाढ झाली असून त्यांची संख्या 6 झाली आहे. या सह खोकड, रानमांजर, रानडुक्कर, कोल्हा, मोर, निलगाय आणि काळवीट यांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले. या गणनेत एकूण 14 प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळले. त्यांची एकूण संख्या ही 757 इतकी दिसून आली.
गणनेत आढळलेले पक्षी आणि प्राणी
माळढोक - 1
कुदळ्या - 21
लांडगा - 8
खोकड - 13
मुंगुस - 5
रानमांजर - 6
ससा - 18
रानडुक्कर - 249
सायाळ - 1
कोल्हा - 4
घोरपड - 2
मोर - 61
नीलगाय - 6
काळवीट - 362
इतर महत्वाच्या बातम्या
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले