Solapur : एकीकडे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवायचा, दुसरीकडे कार्यालयातच दारूच्या बाटल्या अन् ग्लास; सोलापुरातील नेहरू युवा केंद्राचा प्रताप
Solapur Nehru Yuva Kendra : नेहरू युवा केंद्रातील एका कर्मचाऱ्याची तक्रार देण्यासाठी कार्यालयात गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दारूचे बाटल्या आणि ग्लास आणि आढळून आले.
सोलापूर: नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात (Solapur Nehru Yuva Kendra) दारूच्या बाटल्या सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कार्यालयातील मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून नियुक्त असलेल्या सुभाष चव्हाण याने या दारू बॉटल आणल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे नेहरू युवा केंद्र तरुणातील व्यसनधिनता संपवण्यासाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम देखील चालवते, त्याच नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात दारूच्या बाटल्या आढळणे धक्कादायक असून सुभाष चव्हाण यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
सुभाष चव्हाण याच्या बाबतीत भाजपच्या कार्यकर्त्यांना काही तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारी संदर्भात निवेदन देण्यासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे आणि यतीराज होनमाने हे नेहरू युवा केंद्रात गेले होते. यावेळी कार्यालयात दारूचे रिकामे ग्लास आणि बॉटल्स भाजप पदाधिकऱ्यांना आढळून आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना सभागृह उघडून दाखवयाला सांगितले. त्यानंतर या सभागृहात दारूच्या बॉटल्स आणि ग्लास आढळून आणले.
दरम्यान, कार्यालयात अशा पद्धतीने दारू बॉटल्स आणून ठेवणे चुकीचे असून योग्य त्या कारवाईसाठी राज्य कार्यक्रम अधिकाऱ्यांना कळवू अशी प्रतिक्रिया जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार यांची एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.