Solapur Cime News: बायकोला डोक्यात दगड घालून संपवलं, मेव्हण्याला फोन करुन बोलावलं, पण माहेरचे येण्यापूर्वीच मृतदेह जाळला; सोलापुरातील धक्कादायक घटना
Solapur Cime News : पतीने पाळत ठेवल्यानंतर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पतीने तातडीने लोणी येथे जाऊन पत्नीच्या घरच्यांना हा प्रकार सांगितला. मात्र तिच्या वागण्यात बदल झाला नाही.
![Solapur Cime News: बायकोला डोक्यात दगड घालून संपवलं, मेव्हण्याला फोन करुन बोलावलं, पण माहेरचे येण्यापूर्वीच मृतदेह जाळला; सोलापुरातील धक्कादायक घटना Solapur Cime News Husband Killed Wife With Stone and burned body doubt of extra marital affair Maharashtra Marathi News Solapur Cime News: बायकोला डोक्यात दगड घालून संपवलं, मेव्हण्याला फोन करुन बोलावलं, पण माहेरचे येण्यापूर्वीच मृतदेह जाळला; सोलापुरातील धक्कादायक घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/0a794b667517a8ae617acda1ea76e0d9171930173945789_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी तिच्या मृतदेहाला जाळून टाकले. दक्षिण सोलापूर (Solapur News) तालुक्यातील तेलगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. याप्रकरणी मंद्रूप पोलिस ठाण्यात पतीसह त्याच्या भावा विरोधात हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भाग्यश्री बसवराज कोळी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती बसवराज अडव्याप्पा कोळी याच्या विरुद्ध खुनाचा तर त्याचा भाऊ गजानन आडव्याप्पा कोळी आणि शिवानंद आडव्याप्पा कोळी यांच्याविरुद्ध गुपचूप मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बसवराज आणि भाग्यश्रीचा विवाह 2014 साली होता. त्यांना आदित्य आणि अमृता अशी दोन मुले होती. कोळी दामप्त्य हे निंबर्गी येथे शेती करून आपला उदरनिरर्वाह करत असे. शेतातच हे कुटुंब राहत होते. पती बसवराज हा शेतीबरोबरच गॅरेजमध्ये देखील काम करत असे. बसवराज ज्यावेळी गॅरेजमध्ये कामावरून घरी जाात असे त्यावेळी पत्नी कायम फोनवर बोलत असल्याने पतीला संशय आला. पतीने पाळत ठेवल्यानंतर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पतीने तातडीने लोणी येथे जाऊन पत्नीच्या घरच्यांना हा प्रकार सांगितला. मात्र तिच्या वागण्यात बदल झाला नाही.
घरात झोपल्यानंतर बसवराजने पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या
भाग्यश्रीला समज देण्यासाठी तिचा भाऊ आला. भावाने बहिणीला समज देत पतीला तिच्याकडचा मोबाईल काढून घे असे सांगितले. भावाने दाब दिल्यानंतर भाग्यश्रीने मोबाईल काढून दिला. त्यानंतर भांडण वगैरे करू नका असे सांगून भाऊ निघून गेला. रविवारी बसवराज व भाग्यश्री पती-पत्नी दोघे लोणीला मोबाईल आणण्यासाठी गेले. तिथेच जेवण करून दोघेही रात्री तेलगावला आले. घरात झोपल्यानंतर बसवराजने पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली.
हत्येनंतर पत्नीच्या भावाला केला फोन
पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्यानंतर बसवराजने त्याचा भाऊ शिवानंद कोळी यांनी मेव्हण्याला फोन करून माझ्या भावाने तुझ्या बहिणचा खून केल्याचे सांगितले. तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. भाग्यश्रीच्या भावाने आम्ही आल्याशिवाय अंत्यविधी करू नका असे सांगितले. मात्र बसवराज व त्याचे दोन्ही भाऊ यांनी अंथरुणासह मृतदेह उचलून नदीकाठी घेऊन गेले. तेथे लाकडावर ठेवून पेटवून दिले. दिवस उगवताना नदीकाठी गेलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह जळताना पाहिला. त्यानंतर गावात चर्चा सुरू झाली. तोपर्यंत भाग्यश्रीच्या घरचे आले आणि त्यांनी आक्रोश केला.
पतीला अटक
या खूनाचा प्रकार समजताच पोलीसांनी आरोपी पती बसवराज कोळी याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्यांने खुनाची कबुली दिली. दरम्यान खूनी व मृतदेह जाळण्यास मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मयत भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. याप्रकरणी चंद्रकांत गोविंद कोळी यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास एपीआय प्रशांत हुले करीत आहेत.
हे ही वाचा :
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)