एक्स्प्लोर

Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी, काय दिली कारणं?

Solapur Airport : जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा आमदार, 1 विधानपरिषद सदस्य, दोन खासदार आहेत. प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील या दोन महाविकास आघाडीच्या खासदारांसह महायुतीच्या बहुतांश आमदारांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

सोलापूर : आज सोलापूर विमानतळाचे (Solapur Airport) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुतांश आमदार आणि खासदारांनी दांडी मारल्याचं दिसून आले. जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा आमदार, 1 विधानपरिषद सदस्य, दोन खासदार आहेत. प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील या दोन महाविकास आघाडीच्या खासदारांसह महायुतीच्या बहुतांश आमदारांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. सोलापूर विमानतळाचे उदघाट्न कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने असले तरी प्रशासनाने सोलापूर विमानतळावर या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण आयोजित केले होते. 

कार्यक्रमाचे निमंत्रण जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांना देखील देण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप आमदार सुभाष देशमुख आणि माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य वगळता एक ही आमदार, खासदार गैरहजर होते. तर आपण सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. तर आपल्याला निमंत्रण होते त्यामुळेच आपण आलोय, इतरांबद्दल कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया माजी खासदार डॉ. जायसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला दांडी मारलेल्या आमदार खासदारांनी कारणं दिली आहेत

9 विधानसभा आमदार, 1 विधानपरिषद आमदार, 2 खासदार 

(यातील दोन खासदार हे महाविकास आघाडीचे इतर सर्व जण 10 जण हे महायुतीचे आहेत) 

1) सचिन कल्याणशेट्टी ( भाजप अक्कलकोट आमदार) 
कारण : बंगळूरू येथे महत्वाचे धार्मिक कार्यक्रम असल्याने सहपरिवार आलोय. निमंत्रण होते पण पूर्वनियोजित कार्यक्रममुळे जमले नाही. 

2) विजयकुमार देशमुख (भाजप उत्तर सोलापूर)
कारण : पहिल्या कार्यक्रमचे निमंत्रण होते पण ते कार्यक्रम रद्द झाले दुसऱ्यांदा निमंत्रण नसल्याने उपस्थित नाही. अक्कलकोट येथे बैठकीला होते. 

3) राजेंद्र राऊत 
(भाजप पुरस्कृत, बार्शीचे आमदार)
कारण : निमंत्रण होते पण मतदारसंघात कार्यक्रम आणि बैठक होते. 

4) समाधान आवताडे 
(भाजप, पंढरपूरचे आमदार) 
कारण : निमंत्रण होते पण मंगळवेढा येथील पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त.

5) राम सातपुते 
(भाजप - माळशिरस आमदार)
कारण : निमंत्रण होते पण मतदारसंघात संघटनात्मक बैठक होती. 

6) शहाजीबापू पाटील 
(शिवसेना शिंदे गट - सांगोला आमदार)
कारण : संपर्क झाला नाही. कारण अस्पष्ट

7) यशवंत माने 
(राष्ट्रवादी अजित पवार गट - मोहोळ आमदार )
कारण : कारण अस्पष्ट, संपर्क झाला नाही. 

8) बबनराव शिंदे 
(राष्ट्रवादी अजित पवार गट - माढा आमदार )

9) संजय शिंदे 
(राष्ट्रवादी अजित पवार गट पृरस्कृत अपक्ष - करमाळा आमदार )

10) प्रणिती शिंदे 
( शहर मध्य आमदार होत्या आता खासदार झालेत.)
कारण : अकलूज येथे पूर्वनियोजित कार्यक्रम. उदघाटन आधीपासूनच झालेलं असल्याने हजर राहिले नाही. 

11) धैर्यशील मोहिते पाटील 
( शरद पवार गट - खासदार, माढा लोकसभा)
कारण : अकलूज येथे पूर्वनियोजित कार्यक्रम.

12. रणजितसिंह मोहिते पाटील, विधानपरिषद आमदार 

कारण : संपर्क नाही, कारण अस्पष्ट 

कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार

- सुभाष देशमुख - आमदार भाजप दक्षिण सोलापूर

- जयसिद्धेश्वर महास्वामी - माजी खासदार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणीNana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणारGopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्लाSadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
अभिनेत्री प्राजक्ता माळीने डायरेक्ट स्वतःचं वजनचं सांगितलं, म्हणाली..
Embed widget