Solapur Accident: दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू; भीषण अपघातानं सोलापूर हादरलं
Solapur Accident: दुचाकीच्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Solapur Accident News : सोलापूर : सोलापुरात (Solapur News) दुचाकीच्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. महावीर चौक रस्त्यावर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये इरण्णा मठपती, निखिल कोळी, दिग्विजय सोमवंशी अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे तिघेही एकाच दुचाकीवरुन जात होते.
महावीर चौक येथे मध्यरात्री दुचाकी झाडाला धडकली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. बेशुद्ध अवस्थेतील या तिघांना पोलिसांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी या तिघांना मृत घोषित केलं. भीषण अपघातानं सोलापूर पुरतं हादरुन गेलं आहे.
नेमकं काय घडलं?
सोलापुरात झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीच्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सोलापुरातल्या महावीर चौक रस्त्यावर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये इरण्णा मठपती (वय 24), निखिल कोळी (वय 24), दिग्विजय (आतिश) सोमवंशी (वय 21) ह्या तिघांचा मृत्यू झाला. हे तिघेही एकाच दुचाकीवर होते. महावीर चौक येथे मध्यरात्री झाडाला जोरदार धडक दिल्यानं तिघंही गंभीर जखमी झाले. बेशुद्ध अवस्थेतील या तिघांना ही पोलिसांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी या तिघांना मृत घोषित केलं. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच शासकीय रुग्णालयात मित्र आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
एकाच गावातील तीन तरुण मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन जात होते. अशातच सोलापुरातल्या महावीर चौक रस्त्यावर त्यांचा भीषण अपघात झाला. झाडाला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही तरुणांना तात्काळ रुग्णालयात हलवलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील तीन तरुण दगावल्यानं संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.