मराठा आरक्षण मिळेल का?, शरद पवार म्हणतात माहित नाही; पण केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घ्यावा...
Sharad Pawar : केंद्र आणि राज्य सरकारने हा प्रश्न लवकर सोडवावा आणि समाजासमाजात कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.
सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला आहे. तसेच, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा राज्याचा दौरा करत आहे. याचवेळी, सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रीया दिली आहे. तर, मराठा आरक्षण मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर देतांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'माहित नाही' असे उत्तर दिले आहे. सोबतच मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य आणि केंद्र सरकारने सोडवला पाहिजे असेही शरद पवार म्हणाले.
तर, मराठा आरक्षण मिळेल का? या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार म्हणाले की, “माहिती नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. याच बैठकीत मला देखील बोलवण्यात आले होते. दरम्यान, राज्य सरकराने यासाठी निर्णय घ्यावा असे या बैठकीत त्यांनी भूमिका मांडली. ज्याला सर्वच पक्षाने पाठींबा दिला. त्यामुळे मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही काय करतायत याकडे आमचं लक्ष आहे. तर, दोन्ही सरकारने हा प्रश्न लवकर सोडवावा आणि समाजासमाजात कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी,” असे शरद पवार म्हणाले.
आम्ही पवार कुटुंब वर्षानुवर्षे दिवाळीत एकत्र येतो
राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच दिवाळीच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यावर बोलतांना शरद पवार म्हणाले की, 60 ते 70 वर्षांची माझ्या घराची पद्धत आहे, आम्ही सर्व भाऊ, मुलं कुठेही असलो तरीही दिवाळीच्या दिवशी बारामतीत यायलाच पाहिजे. दरम्यान, कालच्या आमच्या कुटुंबातील भेटीत कोणताही राजकीय संबध नव्हता, तो फक्त कौटुंबिक कार्यक्रम असल्याचे देखील शरद पवार म्हणाले.
मोफत दर्शनावरुन शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल
मध्यप्रदेशमध्ये जर भाजपचं सरकार आलं, तर राम लल्लाचे दर्शन मोफत दिले जाईल असं गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत. यावरच बोलताना शरद पवार म्हणाले की, " दर्शन फुकट घडवू म्हणतात... पण मंदिरात जायला पैसे लागतात का? एखादा व्यक्ती पंढरपूरला गेला तर त्याला दर्शनासाठी पैसे द्यावे लागत नाही. पण रामलल्लाचे दर्शन फुकट घडवू म्हणतात... याचा अर्थ राज्यकर्ते एवढ्या पातळीवर पोहोचले आहेत की, त्याची चर्चा न केलेली बरी, असेही शरद पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sharad Pawar : अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत याची काळजी घेऊ, शरद पवारांनी रणशिंग फुंकलं