एक्स्प्लोर

Shahajibapu Patil : विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली; शहाजीबापू पाटलांचा गंभीर आरोप

Shahajibapu Patil Vs BJP : भाजपने कितीही फसवलं तरी मीलढणारी औलाद आहे. पैशाच्या जीवावर तालुका विकत घेऊन जायचा नाद करू नका असा इशारा शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला.

सोलापूर : भाजपने आपल्याला एकटे पाडलं, विश्वासघात केल्याचा आरोप करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी आता आणखी एक आरोप केला. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाडण्यासाठी भाजपने शेतकरी कामगार पक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला. त्यामुळे सांगोल्यामध्ये (Sangola Election) आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिंदेंचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांचा शेकापच्या बाबासाहेब पाटील यांनी पराभव केला होता. त्यानंतर आता नगरपालिकेच्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर आरोप केला आहे.

Shahajibapu Patil On BJP : आपल्याला पाडण्यासाठी भाजपने काम केलं

लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही आपण प्रचार केला आणि भापजच्या उमेदवाराला 15 हजारांचे मताधिक्य दिलं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने आपल्याला पाडण्यासाठी शेकापच्या उमेदवाराला मदत केली असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला.

सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकापला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केलं आहे. त्यामुळे शहाजीबापू पाटील हे नाराज आहेत.

Shahajibapu Patil Speech : कुत्री-मांजरं आपल्याला घाबरवत आहेत

भापजवर टीका करताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, "सांगोल्याची निवडणूक ही स्वाभिमानाची निवडणूक आहे. आपल्याला गुलाम बनवलं जात आहे, हेलिकॉप्टरमधून येऊन यांनी गुंडशाही सुरू केली आहे. भाजपने आपलं कंबरडं मोडलं. विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली. भाजपसोबत मी इतकं प्रामाणिकपणे वागून ते असं का वागले?"

शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, "पण मी लढणारी लाद आहे. पैशाच्या जीवावर तालुका विकत घेऊन जायचा नाद करू नका. ला महाराष्ट्र घाबरतो, आणि ही कुत्री मांजरं आता मला घाबरवयला लागली आहेत. या तालुक्यात दोन राजे... एक गणपतराव देशमुख आणि दुसरा शहाजीबापू. आता गणपतराव देशमुख यांच्या समाधीला पूजनाचा अधिकारी त्यांच्या कार्यकर्त्यांना उरला नाही."

Eknath Shinde On Shahajibapu Patil : शहाजीबापू जखमी वाघ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सांगोल्याचा वाघ म्हणून शहाजी बापू ओळखले जातात. तो जखमी शेर आहे. 3 तारखेला फटाके तयार ठेवा. कोई माने या ना मानेच.. सांगोल्यात वन अँड ओन्ली आनंदा माने.

शहाजीबापू, तुम्ही घाबरू नका, तुमच्या मागे हा एकनाथ शिंदे आहे. तुमचा कार्यक्रम कुणीही करू शकणार नाही. बापू हळवा आणि तळागाळातील कार्यकर्ता आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. बापूला तुम्ही किती वेळा फसवणार? एकदा, दोनदा... पण आता तुम्ही बापूला फसवू शकणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाजपला टोला लगावला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Embed widget