एक्स्प्लोर

ह्रदयद्रावक... रक्षाबंधनासाठी बहिणीला गावी नेताना भीषण अपघात; बहीण-भावाचा जागीच मृत्यू

रक्षाबंधन सणासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जात असताना झालेल्या भीषण अपघातात दोन्ही बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सोलापूर : रक्षाबंधन सणाचा मुहूर्त काही तासांवर येऊन ठेपला असून बहीण भावाच्या नात्याचा सण साजरा करण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. लाडक्या बहिणी गावाकडे जाऊन भावाच्या हातावर राखी बांधणार आहेत, तर भाऊ देखील आपल्या बहि‍णींकडे राखी बांधायला जात आहेत. बहीण-भावाच्या या प्रेमळ नात्यानं सोशल मीडियाही गजबजलेला पाहायला मिळत आहे. मात्र, अशातच सोलापूर जिल्ह्यातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये, रक्षाबंधन सणासाठी गावाकडे घेऊन येणाऱ्या कारचा अपघात झाल्याने बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.    

रक्षाबंधन सणासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जात असताना झालेल्या भीषण अपघातात दोन्ही बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाच जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी साडे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, जागेवरच कारमधील बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने उपस्थितांनाही गहिवरुन आले. 

पंढरपूरहून-मंगळवेढाकडे निघालेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच 13 बी एन 6649 ची पंढरपूरकडे येत असलेला आयशर टेम्पो आर.जे.36 जी.ए 7971 ला समोरासमोर जोरदार धडक बसली. त्यामध्ये स्विफ्टचा चक्काचूर झाला असून स्विफ्ट कारमधील बहीण भाऊ जागीच ठार झाले आहेत. मंगळवेढा येथील रोहित तात्यासो जाधव (वय 25 वर्षे), ऋतुजा तात्यासो जाधव (वय 19 वर्षे) अशी मयत बहीण भावाची नावे आहेत. दोन्ही मृतांचे मतदेह पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येलाचा काळाने घाला घातल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा

अंघोळीसाठी एकजण गेला, त्याला वाचवायला दुसरा उतरला; सावित्री नदीत बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू 

''लाडकी बहीण योजनेचं कौतुक, पण...''; संभाजी भिडेंनी सरकारकडे व्यक्त केली खंत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वादABP Majha Headlines : 10 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Ganesh Visarjan : नातवाला खांद्यावर घेत मुख्यमंत्री वर्षावरील बाप्पाच्या विसर्जनातPune Firing At Phoenix Mall : आला गोळी झाडी आणि पळाला,  पुण्यात नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget