रात्रीस खेळ चाले...! नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पकडला प्रेशर कुकरचा ट्रक
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
Pune Police Seized Pressure Cooker Truck : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. पण निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. कारण निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसाआधी पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले होते. सातारा रस्त्यावर नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. दरम्यान, पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी प्रेशर कुकरचा ट्रक (Pressure Cooker Truck) पकडला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना पैसा, दारु, भेटवस्तूंचे वाटप करण्यात येते. त्यामुळे, रोकड, दारू, भेटवस्तू आदींची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. दरम्यान, पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावर एसएसटी पथकाने प्रेशर कुकरचा ट्रक पकडला. विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर एसएसटी पथकाची (Static Surveillance Team) ही मोठी कारवाई आहे, ज्यामध्ये 1361 कुकर आले आढळले.
जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी प्रचाराची सांगता झाली, 20 नव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. यावेळी जुन्नर निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली. त्यातच नगर कल्याण महामार्गावर आणे एसएसटी पथकाने (Static Surveillance Team) नाकाबंदी सुरु असताना प्रेशर कुकर घेऊन येणारा ट्रक ताब्यात घेतल्या असून त्यामध्ये 1361 कुकर मिळून आले आहे. या पार्श्वभूमीवर आता आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत असून पुढील तपास केला जात आहे. ट्रक आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ट्रकमधील 1361 प्रेशर कुकर आळेफाटा येथे काही लोकांना दिले जाणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील 288 विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मतदारसंघात बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी ईव्हीएम यंत्रे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आली असून यंदाच्या निवडणुकीत 204 महिलांसह 4,136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राज्यात तब्बल 9 कोटी मतदारांसाठी 1 लाख 427 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
हे ही वाचा -
मोठी बातमी: पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, 1380000000 चा ऐवज, निवडणुकीच्या तोंडावर घबाड