एक्स्प्लोर

Pandharpur News : पंधरा दिवसाच्या थकव्यानंतर विठुराया घेणार विश्रांती, देवाच्या राजोपचाराला सुरुवात, अनेक वर्षांची अविरत परंपरा 

Pandharpur News : कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाळ पुजेसह देवाच्या राजोपचाराला देखील सुरुवात झालीये. तसेच पुणे येथील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट केलीये. 

पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी (Kartiki Ekadashi) आलेल्या लाखो भाविकांना सलग 15 दिवस अहोरात्र उभ्या असलेल्या पांडुरंगाला (Pandurang) आजपासून नियमित विश्रांती मिळणार आहे. आजपासून म्हणजेच शुक्रवार 1 डिसेंबर रोजी प्रक्षाळ पूजा संपली असून आता देवाचे राजोपचार सुरु झाले आहेत. आज देवाचा काढलेला पलंग पुन्हा बसवण्यात आलाय. कार्तिकी यात्रेसाठी 26 नोव्हेंबर रोजी देवाचा पलंग काढून 24 तास दर्शनाला सुरुवात झाली होती. आज 1 डिसेंबर रोजी प्रक्षाळ पूजेनंतर न देवाचे सर्व राजोपचार सुरु होणार आहेत .

सलग 15 दिवस अखंड दर्शन देऊन थकलेल्या विठुरायाचा  थकवा आणि शिणवटा घालविण्यासाठी ही प्रक्षाळ पूजा करण्यात येते. जवळपास शेकडो वर्षांपासून ही पंरपरा सुरु आहे. आज  भल्या पहाटे विठुरायाच्या चरणाला  लिंबू आणि साखर चोळून ठेवण्यात आली. यांनतर संपूर्ण मंदिर स्वच्छ करण्यात आले.  दुपारी देवाच्या प्रक्षाळ पूजेस सुरुवात झाली . मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे  यांच्या हस्ते रुक्मिणी मातेकडे तर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा करण्यात आली .या पूजेत पारंपरिक पद्धतीने ब्रम्ह वृंदांच्या उपस्थितीत मंत्रपठण करीत देवाला गरम पाण्याने रुद्राभिषेक करण्यात आला .  

वारकरी संप्रदायाची भावना

रुद्र आवर्तनाच्या जयघोषात देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. पंचामृत स्नान झाल्यावर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह  प्राप्त होत असल्याची भावना वारकरी संप्रदायात असते. यानंतर देवाला पारंपरिक  मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले .  यात  मस्तकी सुवर्ण मुकुट, गळ्यात अनमोल कौस्तुभ मणी, भाळी निळ्या हिऱ्यांचा नाम, दंडाला दंड पेट्या आणि गळ्यात अत्यंत मौल्यवान मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, तीन पदरी सुवर्ण तुळस माळ, मारवाडी पेठ्यांचे हार, मोठा लफ्फा आणि मोत्याचे कंठे घालण्यात आले. कानाला हिरेजडीत मस्य जोड अशा पोशाखात नटलेल्या विठुरायाचे सौंदर्य अतिशय खुलून दिसत होते.

 रुक्मिणी मातेलाही मौल्यावान दागिने परिधान

रुक्मिणी मातेलाही वाक्या, तोडे, तानवड, मोहरा आणि पुतळ्यांच्या माळा, हायकोल, चिंचपेटी आणि पुतळ्याची माळ अशा पारंपारिक दागिन्यांनी सजविण्यात आले होते. या पूजेनंतर देवाला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात आला आणि देवाची महाआरती करण्यात आली . देवाच्या जोडीने गेली 15 दिवस अहोरात्र  उभी असलेली जगन्माता रुक्मिणी मातेचीही आज पवमान अभिषेकाने प्रक्षाल पूजा करण्यात आली . यावेळी रुक्मिणी मातेलाही हिरे माणक्यांच्या पारंपरिक दागिन्याने सजविण्यात आले होते . 

 अखंड परिश्रम नंतर आजपासून  देव आपल्या शयनकक्षात विश्रांतीसाठी जाणार असल्याने आज देवाचा पलंग बसविण्यात आला . सुगंधी फुलांनी मंदिर आणि देवाचे शयनकक्ष सजविण्यात आला होता . पुणे येथील भाविक अमोल शेरे आणि मोहिते यांनी  ही सजावटीची सेवा दिली .देवाचा शिणवटा घालविण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनविण्यात आलेला 14 आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा देवाला देऊन देवाची शेजारती होऊन देव विश्रांतीला गेले . देवाला हे सर्व उपचार होत असताना देवाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत जात असल्याची अनुभूती पदोपदी जाणवत राहते. सुरुवातीला थकलेला देवाचा चेहरा पूजेनंतर मात्र अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न झाल्याचे पाहावयाला मिळते .दरम्यान उद्यापासून म्हणजे 2 डिसेंबरपासून  विठ्ठल रुक्मिणीचे राजोपचार नियमितपणे सुरु होणार आहेत . 

हेही वाचा : 

Pandharpur News : विठुरायाच्या चरणी भाविकांचे भरभरुन दान, कार्तिकी यात्रेत भाविकांची संख्या निम्मी होऊनही देवाची तिजोरी भरली 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी सोलापूरच्या नेत्यांच्या जोर बैठका, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते यांची चढाओढ
विधान परिषदेसाठी सोलापूरच्या नेत्यांच्या जोर बैठका, राजेंद्र राऊत, राजन पाटील, राम सातपुते यांची चढाओढ
Solapur Crime News: लग्नानंतर 2-3 महिने संसार सुखाने चालला; पत्नीसोबत बोलायला आला, पेट्रोल टाकलं, लाईटर काढला अन्...सोलापुरातील हादरवणारी घटना
लग्नानंतर 2-3 महिने संसार सुखाने चालला; पत्नीसोबत बोलायला आला, पेट्रोल टाकलं, लाईटर काढला अन्...सोलापुरातील हादरवणारी घटना
Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: ठाणे, पुणे, सोलापूरपासून सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार, पाहा A टू Z माहिती
ठाणे, पुणेपासून सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरपर्यंत...; विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार, पाहा A टू Z माहिती

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget