एक्स्प्लोर

धक्कादायक! सार्वजनिक महिला शौचालयात आढळला नऊ वर्षाच्या बालकाचा मृतदेह, पंढरपूर हादरलं

पंढरपुरात सार्वजनिक शौचालयामध्ये 9 वर्षाच्या बालकाचा मृतदेह आज पहाटे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने परिसरात खूप भीतीचे वातावरण पसरली आहे.

Pandharpur News Updates:  पंढरपूरमध्ये महिलांसाठी बांधण्यात आलेल्या आणि सध्या बंद अवस्थेत असलेल्या सार्वजनिक शौचालयामध्ये 9 वर्षाच्या बालकाचा मृतदेह आज पहाटे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बालकाच्या मृतदेहाची चिरफाड झाल्याने हा खून आहे की दुसरे काही याचा शोध आता पोलीस घेत आहेत. अतिशय धक्कादायक असलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण  आहे. 

शहरातील संतपीठ भागातील जगदंबा वसाहतीमध्ये राहणाऱ्या तिमा पांडूरंग धोत्रे यांचा नऊ वर्षाचा मुलगा कृष्णा तिमा धोत्रे हा रविवारी रात्री आठ वाजता नातेवाईकांच्या घरातून जेवण करून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी किंवा नातेवाईकांच्या घरी आला न आल्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न घरातील मंडळी करत होते. रात्री तिमा धोत्रे हे संतपेठ पंढरपूर येथील घराशेजारी बंद असलेल्या सार्वजनिक महिला शौचालयाजवळून सोमवारी पहाटे जात असताना त्यांना हा मृतदेह आढळून आला. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल 

त्यांनी मोबाईलची बॅटरी लावून पाहिल्यानंतर तो मृतदेह कृष्णाचा असल्याचे समजले. त्याचा शरीरातील नरड्याखालील भाग ते बेंबीपर्यंत भाग गायब होता. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सी. व्ही केंद्रे,  कपिल सोनकांबळे,  आकाश भिंगारदेवे या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे, सचिन हेंबाडे, दादा माने, सचिन इंगळे, बिपीन ढेरे, शरद कदम, राकेश लोहार, शहाजी मंडले, सुनील बनसोडे हे  घटनास्थळी पोहोचले.

परिसरात भटके कुत्रे आणि डुकरांचा मोठा सुळसुळाट  

या परिसरात भटके कुत्रे आणि डुकरांचा मोठा सुळसुळाट असल्याने अशा प्राण्यांनी त्याला जखमी करून त्याच्या शरीराचा भाग खाल्ला असल्याने कृष्णाचा मृत्यू झाला का? अशी शंका आता पुढे येऊ लागली आहे. तर  कृष्णावर  डुकराचा हल्ला नसून त्याचा घातपात झाला असावा, अशी शंका नागरिक व्यक्त करू लागल्याने  या प्रकरणाची  सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.  

परिसरात खूप भीतीचे वातावरण पसरली

दरम्यान पोलिसांनी या सर्व प्रकारची सखोल चौकशीला सुरुवात केली असून एखादा सीसीटीव्ही फुटेज मिळतोय का याचाही तपस पोलीस करू लागले आहेत. या प्रकरणाने परिसरात खूप भीतीचे वातावरण पसरली आहे. या घटनेनंतर  लहान मुलांची पालकांना मोठी काळजी वाटू लागली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
Akshay Kumar Helps Jackky Bhagnani :  फ्लॉप चित्रपटाने प्रोडक्शन हाऊसचं नुकसान, अक्षय कुमारने निर्मात्यांना काय सांगितले?  अखेर समोर आली 'ती' गोष्ट...
फ्लॉप चित्रपटाने प्रोडक्शन हाऊसचं नुकसान, अक्षय कुमारने निर्मात्यांना काय सांगितले? अखेर समोर आली 'ती' गोष्ट...
Munjya Box Office Collection Day 25 : 'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक
'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deekshabhumi Protest : दीक्षाभूमी भूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूMajha Vitthal Majhi Wari : हरिनामाच्या गजराने दुमदुमणार दिवे घाटABP Majha Headlines :  12:00PM : 2 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGirish Mahajan On Ambadas Danve | शिवीगाळ करणं विरोधी पक्षनेत्यांना शोभणारं नाही -गिरीश महाजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
Akshay Kumar Helps Jackky Bhagnani :  फ्लॉप चित्रपटाने प्रोडक्शन हाऊसचं नुकसान, अक्षय कुमारने निर्मात्यांना काय सांगितले?  अखेर समोर आली 'ती' गोष्ट...
फ्लॉप चित्रपटाने प्रोडक्शन हाऊसचं नुकसान, अक्षय कुमारने निर्मात्यांना काय सांगितले? अखेर समोर आली 'ती' गोष्ट...
Munjya Box Office Collection Day 25 : 'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'मुंज्या'नं बॉक्स ऑफिसला झपाटलं; 100 कोटींच्या क्लबमध्ये झोकात एन्ट्री, मराठमोळ्या आदित्यचा बॉलिवूडमध्ये डंका
'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक
'माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या पाच जणांच्या चरणी माझं यश अर्पण', विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावूक
Taimur Playing Cricket at Lords : तैमूरचं आजोबांच्या पावलावर पाऊल, लॉर्डसमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे; पाहा तुफान फटकेबाजीचा VIDEO
तैमूरचं आजोबांच्या पावलावर पाऊल, लॉर्डसमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे; पाहा तुफान फटकेबाजीचा VIDEO
Mumbai News: आधी हिजाब बंदी आता चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जीन्स, टी शर्ट, जर्सीही घालता येणार नाही
आधी हिजाब बंदी आता चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जीन्स, टी शर्ट, जर्सीही घालता येणार नाही
बुलढाण्यातील रुग्णालयात रुग्णांभोवती चक्क डुकरांचा अधिवास; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील भीषण वास्तव
बुलढाण्यातील रुग्णालयात रुग्णांभोवती चक्क डुकरांचा अधिवास; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील भीषण वास्तव
Salman Khan Firing Case : 'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
Embed widget