एक्स्प्लोर

पावसाने पाठ फिरवल्याने हिरव्या चाऱ्याच्या किमती कडाडल्या, पशुपालकांच्या अडचणीत वाढ

पंढरपूर बाजार समितीमध्ये रोज सकाळी हिरव्या चाऱ्याचा मोठा बाजार भारत असतो. सध्या रोज या हिरव्या चाऱ्याच्या भावात वाढच होताना दिसू लागली आहे.

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती भीषण बनत चालली असून पावसाने पूर्ण पाठ फिरविल्याने आता ऐन पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या किमती दुपटीने वाढू लागल्या आहेत. अजून काही दिवसांनी चार मिळणेही मुश्किल होणार असल्याने आता तरी शासनाने तातडीने आजार डेपो सुरु करण्याची मागणी पशुपालक करू लागले आहेत .यातच सध्या हिरवा चाऱ्याबरोबरच मका देखील पाण्याअभावी जळाला आहे.  ऊसही मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागल्याने साखर कारखादारांच्या समोरच्या अडचणी देखील वाढणार आहेत .

पंढरपूर बाजार समितीमध्ये रोज सकाळी हिरव्या चाऱ्याचा मोठा बाजार भारत असतो. सध्या रोज या हिरव्या चाऱ्याच्या भावात वाढच होताना दिसू लागली आहे. सुरुवातीला दोन हजार रुपये टन भावाने जाणारा हिरवा चार आता पाच हजार रुपये टन भावानेही मिळणे अवघड बनत चालले आहे. सध्या मक्याची अवाक वाढल्याने अजूनही किमती मर्यादित असल्या तरी हळूहळू हे संपत जाऊ लागल्याने पुन्हा किमती वाढू लागल्या आहेत. तयार मक्याला2200 पर्यंत भाव मिळत असतो मात्र हिरव्या मक्याची दामदुप्पट पैसे मोजायची वेळ पशुपालकांवर आली आहे. याच पद्धतीने सोलापूर भागात पाऊस न झाल्याने शेतातील उभ्या उसाला पाण्याअभावी हुमणी रोगाने ग्रासण्यास सुरुवात झाली आहे. यातच पाणीच मिळत नसल्याने उभा ऊस फडात जळू लागला आहे.यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी शेतातील ऊस हिरवा चार म्हणून आणण्यास सुरुवात केली आहे . 

सध्या या हिरव्या चांगल्या उसाला साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने कारखान्याला देण्यापेक्षा हिरव्या चाऱ्यासाठी ऊस देण्याची मानसिकता शेतकऱ्यांची होऊ लागली आहे. यात खराब झालेल्या ऊसालाही 2500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सध्या पाऊस नसल्याने असाही हा ऊस जळून जाणार असून वर्षभर कसा सांभाळायचा हा प्रश्नही शेतकऱ्यांच्या समोर आहे. जरी कसाबसा सांभाळला तरी वर्षांनी कारखान्याला ऊस देऊनही खूपच कमी पैसे मिळणार असल्याने जिल्ह्यातील विविध बाजार समित्यात हा ऊस विक्रीसाठी येत आहे .पंढरपूर बाजार समिती मध्ये रोज 60 ताणाच्या आसपास हिरवा चारा येतो त्यात 25 ते 30 टन ऊस असल्याने या हंगामात उसासाठी कारखानदारांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे . 

हिरव्या चाऱ्याच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने पशुधन कसे वाचवायचे हा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे . एकाबाजूला दुधाला भाव नाही आणि त्याचवेळी दुष्काळामुळे हिरव्या चाऱ्याच्या किमती दुपटीने वाढत चालल्याने करायचे काय ही अडचणी पशुपालकांच्या समोर आहे . अशा कठीण परिस्थितीत गोठ्यातील जनावरे विकून जगायचे कसे असा सवाल पशुपालक करीत आहेत . यासाठी आतातरी शासनाला या मुक्या जनावरांची दया येऊन तातडीने चार छावण्या सुरु केल्या तर हे पशुधन वाचणार आहे अन्यथा अजून काही दिवसांनी चर्या अभावी परिस्थिती खूपच भीषण बनेल असे पशुपालक सांगत आहेत . सध्या पडेल त्या भावाने कर्जाने पैसे उचलून जनावरे वाचवण्याचा प्रयत्न पशुपालक करीत असले तरी अजून काही दिवसांनी हि ताकद देखील संपल्यावर करायचे काय असा सवाल पशुपालक करीत आहेत . शेतातील उभा ऊस चाऱ्यासाठी येऊ लागल्यावर कारखाने चालवायचे कसे हि अडचण देखील कारखानदारांच्या समोर येत असल्याने तातडीने चार डेपो सुरु केले तर हे पशुधन वाचेल अशी मागणी पशुपालक करत आहेत . 

हे ही वाचा :

 नवीन कार घेतल्याच्या आनंदाला लागली दृष्ट, शिक्षकासह नवी कोरी कार बुडाली विहिरीत, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
×
Embed widget