एक्स्प्लोर

Madha Fire : माढ्यातील केवडमध्ये किराणा दुकानाला भीषण आग, 33 लाख रुपयांचं साहित्य जळालं, दीड लाखांच्या रोकडही खाक

Madha Fire : किराणा दुकानाला भीषण आग (Fire Broke) लागल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यात केवड (Kewad) गावात घडली आहे.

Madha Fire : किराणा दुकानाला भीषण आग (Fire Broke) लागल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यात केवड (Kewad) गावात घडली आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे 'गंधर्व किराणा स्टोअर्स अँड ट्रेडिंग कंपनीला' (Gandharva Kirana Stores and Trading Company) ही आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं आहे. या आगीत 33 लाख रुपयांच्या साहित्यासह दीड लाख रुपयांची रोकडही भस्मसात झाली आहे. याबाबतची माहिती दुकानाचे मालक गणेश महारुद्र चव्हाण (Ganesh Chavan) यांनी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार या आगात चार मोठे फ्रिज, फॅन, कॉम्प्युटर, इलेक्ट्रीक वजनकाटे, LED TV तसेच दुकानातील तांदूळ, शेगदाणा,सर्व प्रकारच्या दाळी, खाद्य तेल, साखर, बेसण, ड्रायफुड, विविध प्रकारचे मसाले, सौंदर्य प्रसाधने, शालेय स्टेशनरी साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच फर्निचरही जळाले आहे. एकूण 33 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर दीड लाख रुपयांची रोक रक्कम देखील जळून खाक झाली आहे. मोठा आर्थिक फटका चव्हाण यांनी बसला आहे. 

Madha Fire : माढ्यातील केवडमध्ये किराणा दुकानाला भीषण आग, 33 लाख रुपयांचं साहित्य जळालं, दीड लाखांच्या रोकडही खाक

येत्या आठवड्यात होणार होते मॉलचे उद्घाटन 

गेल्या काही दिवसांपासून गंधर्व ट्रेडिंग कंपनीच्या गंधर्व मॉलचे काम सुरु आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले होते. येत्या आठवड्यात कालिदास चव्हाण यांच्या या मॉलचे उद्घाटन देखील होणार होते. मात्र, त्यापूर्वीच मॉलसह किराणा दुकान आगीत जळाल्याची घटना घडली.  

Madha Fire : माढ्यातील केवडमध्ये किराणा दुकानाला भीषण आग, 33 लाख रुपयांचं साहित्य जळालं, दीड लाखांच्या रोकडही खाक

आग भीषण असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश

दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच चव्हाण कुटंबियांसह केवड येथील ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भीषण असल्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलं. त्यानंतर बार्शी येथून अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यावर आग अटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळाले होते. याबाबत गणेश चव्हाण यांनी माढा पोलिसात माहिती दिली आहे. या आगीत आमचं मोठं नुकसान झालं आहे. दुकानातील सर्व साहित्य जळाले आहे. हाती काहीच शिल्लक राहिले नसल्याची माहिती गणेश चव्हाण यांनी दिली. 

Madha Fire : माढ्यातील केवडमध्ये किराणा दुकानाला भीषण आग, 33 लाख रुपयांचं साहित्य जळालं, दीड लाखांच्या रोकडही खाक

महत्त्वाच्या बातम्या:

Bhiwandi News : पेटता दिवा पडल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक, भिवंडीतील धक्कादायक घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget