Sanjay Raut : पक्ष सोडून गेलेले परत येणार असतील तर बाजूला जातो : संजय राऊत
महाराष्ट्राच्या भूमीला संतांच्या भूमीची असलेली ओळख पुसली जाऊन आता ती गद्दारांची भूमी या नावाने ओळखली जाऊ लागली आहे .ती गद्दारांची भूमी म्हणून झालेली ओळख पुसून काढण्याची सुबुद्धी जनतेला दे असेच मागणे मागणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
पंढरपूर : सध्या राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय. कोण कुणासोबत गेलंय हेच समजत नाहीये. परंतु जे नेते सरकारसोबत गेलेत. त्यांनी मात्र पक्षातील काही लोकांमुळे आपण गेलो असल्याचं स्पष्ट केलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यांनी पत्रकार परिषदेत याच पार्श्वभूमीवर आज एक विधान केलं. माझ्या वक्तव्याने जर ते बाजूला गेले मी बाजूला जातो. ते परत येणार आहेत का? असं वक्तव्य त्यांनी केलं. मात्र पत्रकारांनी जेंव्हा त्यांना पुन्हा हाच प्रश्न विचारला तेंव्हा मात्र त्यांनी ऑन कॅमेरा घूमजाव केला. आज संजय राऊत आपल्या कुटुंबासमवेत विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे आले असता ते माध्यमांशी बोलत होते .
गद्दारी करणाऱ्या छगन भुजबळ यांचा यापूर्वी मुंबई आणि नाशिकमधून आम्ही पराभव केलाय आता त्यांना येवल्यातून पराभूत करू असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरे आमचे मित्र असले तरी मोदी आणि शहा यांच्या दडपशाही विरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून अनेक दगडावर पाय ठेऊन आता कोणालाही राजकारण करता येणार नाही असा टोलाही राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.पानसे हे चर्चा करण्यासाठी योग्य व्यक्ती नसून एका फोनवर राज आणि उद्धव ठाकरे बोलू शकतात असे राऊत यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या भूमीला संतांच्या भूमीची असलेली ओळख पुसली जाऊन आता ती गद्दारांची भूमी या नावाने ओळखली जाऊ लागली आहे .ती गद्दारांची भूमी म्हणून झालेली ओळख पुसून काढण्याची सुबुद्धी जनतेला दे असेच मागणे मागणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. राज्याच्या 11 कोटी जनतेच्या मनात असलेले साकडे मागणार असून राज्यात 2024 साली पुन्हा जनतेच्या मनातील सरकार आण असे मागणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. बाहेरच्या राज्यातील मुख्यमंत्री पांडुरंगाकडे येतात आणि राजकारण करतात असा टोला तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर याना लगावला. सुषमा अंधारे यांच्या बाबत प्रश्न विचारताच सोडून द्याहो काहीतरी विषय घेऊ नका तुम्ही असे म्हणत बोलणे टाळले .
निवडणूक आयोगासारख्या संस्था मोदी शहा यांच्या ताब्यात असून आपले तत्व सगळे घालवल्याने आता निवडणूक आयोगाकडून न्याय मिळायची अपेक्षा कोणाला नाही. आता फक्त अशा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडून अपेक्षा असल्याचे संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा :