Nitesh Rane : अजितदादा आमच्या हिंदू जनआक्रोश मोर्चात दिसतील, अयोध्येला महाआरतीही करतील : नितेश राणे
Nitesh Rane : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्या हिंदू जनआक्रोश मोर्चात दिसतील असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलं.
Nitesh Rane : अजितदादांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) आणि त्यांच्या विचाराला समर्थन दिले आहे. त्यामुळं ते आमच्या हिंदू जनआक्रोश मोर्चात दिसतील असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलं. तसेच अजित पवार (Ajit Pawar) हे समान नागरी कायद्यासाठी समर्थन करतील, अगदी अयोध्येला महाआरती देखील करतील असं राणे म्हणाले. सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर इथं सकल हिंदू समाज जनआक्रोश मोर्चासाठी नितेश राणे आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं.
यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केली. तब्येतीची चौकशी करण्यासाठी अजितदादा सिल्वर ओकवर गेल्याची बातमी आल्याने मातोश्रीवाल्यांची तब्येत बिघडल्याचा टोलाही नितेश राणे यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांची येती दिवाळी ऑर्थर रोड जेलमध्ये असेल असा दावा राणेंनी केला. आयुष्यभर संजय राऊत यांनी धुनी भांडी केली. पहिल्यांदा मातोश्रीवर त्यानंतर सिल्वर ओकवर असेही राणे म्हणाले. मला समजलं की राहुल गांधीच्या घरीसुद्धा संजय राऊत धुनी भांडी करतात अशा शब्दात संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
संजय राऊत आता बेरोजगार
पूर्वी संजय राऊत यांना दोन्हीकडून पगार मिळत असे पण आता ते बेरोजगार झाल्यानं अर्धा पगार कसातरी मिळतो. म्हणून ते वेड्यासारखे बडबडत सुटल्याचे राणे यांनी सांगितले. शिवसेनेचा कोणताही आमदार उद्धव ठाकरेंकडे जाणार नसून हे अधिवेशन सुरु होऊ द्या मग सांगा कोणकोणत्या पक्षाचे आमदार इकडे येतात असे राणे म्हणाले. उध्दव ठाकरेंचा गट हा बचत गटापुरता उरला आहे. या अधिवेशनानंतर त्यांच्याकडे फक्त हम दो एवढेच दिसतील असा टोलाही राणेंनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या:
अजित पवारांनी आता आवडीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, शहाजीबापूंनी केले दादांचे कौतुक