एक्स्प्लोर

Sushma Andhare: एकनाथ शिंदेंचा भाजप गेम करणार, 40 पैकी 20 आमदार फोडणार, सुषमा अंधारेंचा दावा

Maha Prabodhan Yatra: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजप गेम करणार आहे. 40 पैकी 20 आमदार भाजप फोडणार आहे. यामध्ये पहिला क्रमांक शहाजी बापू असतील आणि दुसरे तानाजी सावंत असतील, असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय.

Sushma Andhare Maha Prabodhan Yatra: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजप गेम करणार आहे. 40 पैकी 20 आमदार भाजप फोडणार आहे. यामध्ये पहिला क्रमांक शहाजी बापू असतील आणि दुसरे तानाजी सावंत असतील, असा दावा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्या मोहोळ येथे महाप्रबोधन यात्रामध्ये बोलत होत्या. यावेळी सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. सत्ता हेच महत्वाचं असतं तर उद्धव ठाकरे पुन्हा येईन पुन्हा येईल यासारखा आकांडतांडव केला असता पण तसं नाहीये, असा टोला सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 

एकनाथ शिंदे गेल्यानं शिवसेनाला फरक पडत नाही -
जे लोकं म्हणतात शिवसेना संपली, देवेंद्र फडणवीस म्हणाले शिल्लक सेना... पण मागच्या दोन महिन्यापासून यात्रेला अशीच गर्दी आहे. अनेकजण शिवसेनेत आले. अनेक जण गेलेही, पण शिवसेनाला काही फरक पडला नाही. नारायण राणे आले गेले, चुलत भाऊ राज ठाकरे आले आणि गेले काही फरक पडला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे गेले तरी काही फरक पडणार नाही. आमदार कुठेही पळाले असले तरी निष्ठावंत शिवसैनिक हे शिवसेनेसोबत आहेत. त्यांच्या सोबत संवाद साधला पाहिजे, राज्याचे प्रश्न मांडले पाहिजेत, यासाठी ही महाप्रबोधन यात्रा निघाली, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. 13 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ काढून मला बदनाम करण्याचे प्रयत्न केले, असेही यावेळी त्या म्हणाल्या. 

तुम्ही माझा अभिमन्यू करु शकत नाहीत, कारण...
यांना वाटलं की टीका केली की सुषमा अंधारे थांबेल, घाबरेल टीका करणार नाही. पण मी घाबरत नाही, मी बाळासाहेबांची शिवसैनिक आहे. कायद्याची मोडतोड होऊ नये म्हणून मी लढतेय. पंकजा ताई बहुजन नेत्या आहेत, त्यांना संपवण्यासाठी बोलले. बहुजन नेत्यांना जरी ते भाजपमध्ये असले तरी त्यांना टार्गेट करण्याचे काम करण्यात आलं. 
तावडे, मुंडे, बावनकुळे आदी भाजप नेत्यांना देखील साईड करण्यात आलं. या अनाजीपंतच्या वंशजानी, ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिलाय. सावित्रीमाईला त्रास दिलाय तिथं सुषमा अंधारेला त्रास देणे तर फार सोपे आहे. पण मी अभ्यास करून आलेय, मेरिटवर आलेय. तुम्ही अनेकांचे अभिमन्यू केले असतील पण माझा करू शकणार नाहीत, असा टोला सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लगावला. 

भाजप नेता राज्यपालांचा राजीनामा मागत नाही -
भाजपच्या नेत्यांनी महापुरुषबद्दल बेताल वक्तव्य केले. त्यावर राजीनामा मागत नाहीत. मात्र काही सेकंदाचा जुना व्हिडीओ काढून आशिष शेलार माझा राजीनामा मागत आहेत. एकही भाजप नेता राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मागत नाही. असे म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्यांचे आणि राज्यपालांच्या वक्तव्याचे व्हिडीओ लावण्यास सांगितलं. भाजपकडे असलेला आक्रोश दुसरीकडे वळवण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत, असे  सुषमा अंधारे म्हणाल्या. 

ईडीच्या भीतीने गेले -
ज्या एकनाथ शिंदेने बंड केले, त्यांनी अडीच वर्ष सत्ता भोगली. त्यांना वाटलं असेल हिंदुत्वाबद्दल असं तर मग का ही सत्ता भोगली. ना हे हिंदुत्वसाठी गेले, ना हे कुठल्या कारणासाठी गेले.. हे तर ईडीच्या भीतीने गेले आहेत. 10 वर्षांपूवी आनंद तरे यांनी सांगितलं होतं की एकनाथ शिंदेंना आवरा. शिवसैनिकाला कसं कळतं बघा, असे म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका केला. मुख्यमंत्री असताना देखील उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना नगररचना खाते दिले. जे आजपर्यंत कोणत्याच मुख्यमंत्री यांनी दिलेलं नव्हतं. 
या सर्वांना वाटलं की भाजपमुळे सत्ता मिळेल, मंत्रिपद मिळेल, ज्यांना काही मिळणार नाही त्यांना खोके तरी मिळतील. या राजकारणात लोकांचे प्रश्न कुठे आहेत?
हे गेले त्यातल्या प्रत्येकाला नोटीस आली होती म्हणून गेले आहेत, असा टोला अंधारेंनी लगावला. 

महत्त्वाच्या बातम्या

Solapur News: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
Praniti Shinde on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
FDA Actions News: तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रवासाकडे पाहिलं तर अब्राहम लिंकन यांची आठवण येते: राजीव खांडेकर
सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रवासाकडे पाहिलं तर अब्राहम लिंकन यांची आठवण येते: राजीव खांडेकर

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Pune Crime News: पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Maharashtra Live blog updates: मुंबईत इमू पक्ष्यांच्या अंड्यांमधून गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष; तिघांना सहा वर्षांचा कारावास
Embed widget