एक्स्प्लोर

Govind Barge Case: नर्तिका पूजाच्या प्रेमात ठार वेडा; कलाकेंद्रा व्यतिरिक्त, घरी तर कधी बीड कधी वैरागच्या लॉजवर भेटायचे, गोविंद बर्गे प्रकरणात नवा खुलासा समोर

Govind Barge Case: गोविंद बर्गे हे पूजाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले होते. कला केंद्रातील भेटींव्यतिरिक्त ते विविध ठिकाणी एकत्र फिरत आणि लॉजवर राहत असत. बीडसह वैरागमधील काही लॉजवर ते दोघे सोबत राहिले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (govind Barge)(वय ४५) यांच्या आत्महत्येच्या घटनेला नवे वळण मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बर्गे यांनी आपल्या कारमध्ये बसून स्वतःवर गोळी झाडली होती. ही घटना बार्शीतील नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोर घडली. सुरुवातीला, पूजाने संपर्क तोडल्याने नैराश्येत जाऊन त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा होती. मात्र, पोलिस तपासानंतर या प्रकरणात अनेक नवे पैलू उघडकीस येत आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पूजाने कबुली दिली आहे की तिचे आणि गोविंदचे केवळ ग्राहक–नर्तिका एवढेच संबंध नव्हते, तर ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. बर्गे हे पूजाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले होते. कला केंद्रातील भेटींव्यतिरिक्त ते विविध ठिकाणी एकत्र फिरत आणि लॉजवर राहत असत. बीडसह वैरागमधील काही लॉजवर ते दोघे सोबत राहिले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच, बर्गे कधी तिच्या घरात किंवा वेगळ्या फ्लॅटवरही भेटत असत.(Govind Barge Case)

याशिवाय, पूजाच्या बँक खात्यात गोविंद बर्गे यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासात लाखोंच्या व्यवहारांचा उल्लेख असून त्याबाबत पोलिस आता अधिक सविस्तर माहिती गोळा करत आहेत. या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान पूजाच्या सहकारी व मैत्रिणींचेही जबाब नोंदवण्यात आले. या जबाबांनंतर गोविंद आणि पूजा यांच्यातील संबंधांची अधिक पुष्टी झाली आहे. दरम्यान, न्यायालयाने पूजाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडे अजूनही या प्रकरणातील अनेक बाबींची चौकशी बाकी आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येच्या काही दिवस आधीच गोविंदने पूजाला व्हॉट्सअॅपवर "आपण आयुष्य संपवणार" अशी धमकी दिल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.

या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणातही खळबळ उडाली आहे. माजी उपसरपंच म्हणून बर्गे यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील वैयक्तिक आयुष्य, आर्थिक व्यवहार, तसेच मानसिक दबाव यांची चौकशी पोलीस बारकाईने करत आहेत. पुढील काही दिवसांत या घटनेचे अजून नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पूजा गायकवाडचा जामिनाचा मार्ग मोकळा

दरम्यान, आधी पाच दिवस आणि नंतर दोन दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर बार्शी न्यायालयाने पूजाला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली  आहे. पण पूजाला कुठेही जाता येणार नाही. तिला पोलीस  चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे.  पण आता पूजा गायकवाड जामिनासाठी अर्ज करू शकते. त्यामुळे आता पूजा गायकवाड हिची सोलापुरातील महिला कारागृहात करण्यात रवानगी करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. ते अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते.

गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला. कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता. त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कानशिलात गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरुन डाव्या बाजूने बाहेर पडली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission : मतदार याद्यांवरून रणकंदन, आयोगाच्या उत्तराने विरोधक संतप्त
Voter List Row : मतदार याद्यांमध्ये घोळ, निवडणूक आयोगावर चौफेर टीका Special Report
Vote Jihad: 'उद्धव ठाकरेंना एका खानाला Mumbai वर लादायचंय', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप
Devendra Fadnavis Agnry on Conratctor : प्रकल्प रखडलेले, मुख्यमंत्री भडकले Special Report
Pune Leopard Attack : नरभक्षक बिबट्या वनतारात? प्रशासन जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Embed widget