Gautami Patil : सोलापुरात गौतमी पाटीलच्या डान्सचा तडका; चाहत्यांची तुफान गर्दी
Gautami Patil : सोलापुरच्या माळशिरसमधल्या नातेपुतेमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Gautami Patil Solapur Dance : सोलापुरच्या (Solapur) माळशिरसमधल्या नातेपुते परिसरात एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गौतमी पाटीलने (Gautami Patil) डान्स सादर केला. कार्यक्रमादरम्यान गौतमीचा डान्स पाहण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. तिच्या डान्सवर महाराष्ट्रातून टीका केली जात आहे. तिच्या नृत्यात अश्लीलता असल्याची टीका करत तिने डान्स करणं बंद करावं अशी मागणी काही मंडळींनी केली आहे. अशातच आता सोलापुरात गौतमी पाटीलच्या नृत्याचा तडका पाहायला मिळाला आहे. यादरम्यान रसिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सोलापुरात गौतमीचा डान्स पाहण्यासाठी तरुणांपासून वयोवृद्धांनी गर्दी केली होती. गौतमी पाटीलच्या डान्सवर बंदी घालण्यात यावी या मागणीनंतर तिचा इंदापूर तालुक्यातील निमगावातील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता सोलापुरात गौतमीला पाहण्यासाठी तुफान गर्दी आणि चाहत्यांचा गोंधळ पाहायला मिळाला.
View this post on Instagram
गौतमी पाटील कोण आहे?
गौतमी पाटील ही सोशल मीडियावर ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा आहे. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरतिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. इतकंच काय तर अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं जातं आणि त्यासाठी तिला मानधन दिलं जातं. दरम्यान काही दिवसांपूर्वी व्हिडीओमधील डान्स स्टेप्समुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली. सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्या, ज्यामुळे गौतमीला माफी मागावी लागली होती.
संबंधित बातम्या
Pune gautami patil : गौतमी पाटीलचा निमगाव केतकीतील लावणीचा कार्यक्रम रद्द; गावकऱ्यांनी कार्यक्रमासाठी जागाच दिली नाही
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
