एक्स्प्लोर

Pune gautami patil : गौतमी पाटीलचा निमगाव केतकीतील लावणीचा कार्यक्रम रद्द; गावकऱ्यांनी कार्यक्रमासाठी जागाच दिली नाही

gautami patil: नृत्यामुळे तरुणांना भुरळ घालणाऱ्या लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलचा इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Pune gautami patil :  नृत्यामुळे तरुणांना भुरळ घालणाऱ्या लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलचा (gautami patil) इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावरती बंदी घालावी, अशी मागणी जोर धरत असताना हा रद्द झालेला कार्यक्रम आता चर्चेचा विषय ठरत आहे.

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमध्ये गणेश जयंतीनिमित्त गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यापूर्वीच्या तिच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी पाहता गावकऱ्यांंनी कार्यक्रमासाठी जागा देण्यास नकार दिला आहे. सुरक्षेचं कारण देत गावकऱ्यांनी गौतमीचा कार्यक्रम रद्द केला आहे. यापूर्वीदेखील बारामतीत निरा वागसमध्ये कार्यक्रम झाला होता. त्यावेळी गोंधळ झाला होता. 

सोशल मीडियावरुन बंदी घालण्याची मागणी
मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. गौतमी पाटीलच्या लावणीचे अनेक चाहते आहेत. मात्र गौतमीच्या डान्सवर तातडीनं बंदी घालण्यात यावी अशी मागणीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. तिच्या नृत्यातून अश्लिलता दिसते, असा आरोप सातत्याने लावणीप्रेमी आणि लावणी कलाकार करत आहेत. लावणीप्रेमींनी एकत्र येत काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आरोप केले होते. कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली होती. 

सांगलीतल्या कार्यक्रमात राडा
सांगलीतील बेडग इथल्या एका मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आणि बेडग गावचे नाव देशात गाजवणार्‍या मानकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्याचा कार्यक्रम सुरु झाला. तिचं नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातून आणि बाहेरुन तिचे चाहते आले होते. कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या पटांगणात तुफान गर्दी झाल्याने काही प्रेक्षक हे शाळेच्या कौलारु छतावर जाऊन नृत्याचा ताल धरु लागल्याने कौलांचा चुराडा झाला. तार जाळीच्या कम्पाऊंडचेही मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर ज्या झाडावर प्रेक्षक बसले होते ते झाडदेखील मुळासह कोसळलं होतं. 

सोशल मीडियास्टार आहे गोतमी पाटील
गौतमी पाटील ही सोशल मीडियावर ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा आहे. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suman Kalyanpur : भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
Monsoon Updates : मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली
मोठी बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; हवामान खात्याने आता पावसाची नवी तारीख सांगितली

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Embed widget