Gautami Patil : गौतमी पाटील विठुरायाच्या चरणी; सगळ्यांना सुखी ठेवण्याचं घातलं साकडं
Gautami Patil : गौतमी पाटीलने नुकतच विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेत सगळ्यांना सुखी ठेवण्याचं साकडं घातलं आहे.
Gautami Patil : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता तिने पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आहे. गौतमीने यंदाच्या आषाढी वारीत वारकऱ्यांची सेवा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
गौतमी पाटील विठुरायाच्या दारी
गौतमी पाटीलने आज विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर गौतमी म्हणाली की, आषाढी पायी सोहळ्यात थकलेल्या भागलेल्या वारकऱ्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम करण्याचा माझा विचार आहे". विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठुरायाचा सदैव आपल्या डोक्यावर आशिर्वादाचा हात राहावा आणि सगळ्यांना सुखी ठेवावे, असं साकडं विठु चरणी घातल्याचे गौतमीने सांगितले.
पंढरपुरातील कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटीलने विठ्ठलाचं दर्शन घेतलं आहे. नुकतचं बीडच्या तुरुणानं गौतमीला लग्नासाठी मागणी घातली आहे. या लग्नाच्या चर्चांबद्दल बोलताना गौतमी म्हणाली,"सध्या माझा लग्नाचा विचार नाही. लग्नाच्या चर्चांकडे मी दुर्लक्ष करत आहे".
गौतमीच्या आडनावावरुन वाद सुरू
गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. गौतमीच्या पाटील आडनावावरुन आक्षेप घेतला जात आहे. याबद्दल बोलताना गौतमी म्हणाली की,"मी पाटील आहे आणि मी हेच आडनाव लावणार. त्यामुळे कोण काय बोलतय याचा मला फरक पडत नाही. मी जे कार्यक्रम करते ते सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. माझ्या कार्यक्रमांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे".
'सबसे कातिल गौतमी पाटील'ची सध्या तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. तिने आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावलं आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमात वाद होत असतात. गौतमीचा कार्यक्रम आणि चाहत्यांची हुल्लडबाजी हे आता समीकरण झालं आहे.
आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. पण तरीही तिने आपल्या अदाकरीने महाराष्ट्राला वेड लावलं आहे. बदनामीकडे दुर्लक्ष करत तिने नृत्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. तिचा 'घुंगरू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता सगळ्यांना सुखी ठेवण्याचे विठु चरणी साकडं घातल्यामुळे आणि दमलेल्या वारकऱ्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याने गौतमीचं सर्वत्र कौतुक होत आहे. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुफान राडा, नोटांची उधळण होत असते. गौतमी आपल्या नृत्याला अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप तिच्यावर अनेकांनी केला होता. पण तरीही तिच्या नृत्याची क्रेझ मात्र कायम आहे.
संबंधित बातम्या