(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gautami Patil : "लग्नाला यायचं हं! पत्रिकाही देईन"; गौतमीने चाहत्यांना दिलं लग्नाचं आमंत्रण
Gautami Patil : गौतमी पाटीलने नुकतचं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत लग्न कधी करणार याबद्दल भाष्य केलं आहे.
Gautami Patil On Wedding : नृत्यांगणा गौतमी पाटीलने (Gautami Patil) महाराष्ट्रभर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रभर गौतमीचा मोठा चाहतावर्ग असून तिच्या लावणी कार्यक्रमाला चाहते मोठी गर्दी करत असतात. दिवसेंदिवस तिच्या चाहतावर्गामध्ये वाढ होत आहे. अशातच आता एबीबी माझाला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने लग्न कधी करणार याबद्दल मौन सोडलं आहे.
गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. आता एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. गौतमी म्हणाली की,"अजून तरी मी लग्नाचा विचार केलेला नाही. पण जेव्हा लग्न ठरेल, तेव्हा मी तुम्हाला सर्वांना आवर्जुन सांगेन. सर्वांना पत्रिकाही देईन".
गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना गौतमी म्हणाली होती,"तुम्ही लग्नाला या आणि तिथेही गोंधळ घालून जा". दुसरीकडे गौतमी गेल्या काही दिवसांपासून लग्नाबद्दल भाष्य करत असल्याने ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गौतमीला कसा नवरा हवाय? (Gautami Patil Husband)
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने जोडीदाराबद्दल भाष्य केलं आहे. ती म्हणाली,"मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन. आता मी 25 वर्षांची असून माझं लग्न झालेलं नाही. पण लवकरच लग्नबंधनात अडकण्याची माझी इच्छा आहे".
शहरीभागापेक्षा ग्रामीण भागात गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे. तरुणांमध्ये गौतमीच्या डान्सची चांगलीच क्रेझ आहे. तिच्या लावणी कार्यक्रमात गोंधळ होत असतो. पण तरीही पोलिसांच्या उपस्थितीत तिचे कार्यक्रम होतात. गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमी तिच्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
गौतमीची घरची परिस्थिती खूप बेताची होती. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तिने शिक्षण सोडलं आणि ती लावणीच्या क्षेत्राकडे वळाली. अल्पावधीतच तिने लावणी क्षेत्रात चांगलं नाव कमावलं आहे. लवकरच ती 'घुंगरू' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गौतमी पाटील आपल्या डान्समध्ये अश्लील हावभाव करत असल्याने तिच्यावर प्रचंड टीका होतो. पण तरीही तिने आपल्या अदाकारीने सर्वांना वेड लावलं आहे. गौतमीची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असली तरीही तिने यासर्व गौष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या डान्सवर फोकस ठेवला आहे.
संबंधित बातम्या