एक्स्प्लोर

Praniti Shinde : सोलापुरात भाजपकडून मलाच उमेदवारी ही फक्त अफवा; प्रणिती शिंदेंकडून पुन्हा खुलासा

Praniti Shinde On BJP : प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे.

Praniti Shinde On BJP : मागील अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आणि त्यांची मुलगी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. एवढंच नाही तर प्रणिती यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Candidate) देखील दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, यावर पुन्हा एकदा प्रणिती यांनी खुलासा केला आहे. 'सोलापुरात भाजपकडून मलाच उमेदवारी दिली जाणार, ही फक्त अफवा असल्याचे,' प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील (Solapur Lok Sabha Constituency) गावभेटीचा धडाका लावला असून, यावेळी त्या बोलत होत्या.  

दरम्यान यावेळी बोलतांना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, "सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून मी उमेदवार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. पण माझ्या रक्तातच काँग्रेस आहे. माझे वडील काँग्रेसमध्ये आहे, असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला टोला लगावला आहे. तर, मी ईडीला भीत नाही. माझ्याकडे कारखाना नाही, संस्था नाही. नशीब शिंदे साहेब त्यात पडले नाहीत. त्यामुळे मला ईडीची कसलीही भीती नसून, दिलखुलासपणे भाजप विरुद्ध बोलणार असं मत देखील प्रणिती शिंदेनी व्यक्त केलं.

हुकूमशाही सरकार असल्यामुळे आमदार घाबरतात...

"सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची मी एकमेव आमदार आहे. बाकी सर्व आमदार भाजपचे आहेत. भाजपचे आमदार सत्ताधाऱ्याविरुद्ध बोलत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सत्याधारांसमोर मांडणार कोण?, सध्या हुकूमशाही सरकार असल्यामुळे आमदार घाबरत असल्याचे प्रणिती म्हणाल्या. 

प्रणिती शिंदेंचा गावभेटीचा धडाका...

महायुतीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता असून, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात असण्याची शक्यता आहे. असे असतानाच मागील काही दिवसांपासून मतदारसंघात प्रणिती शिंदेंचा गावभेटीचा धडाका पाहायला मिळत आहे. प्रणिती शिंदे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. तसेच, त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी सोलपुरमधील काँग्रेसच्या नेत्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. असे असतानाच त्यांच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा आहे. 

सुशिलकुमार शिंदे यांचा सलग दोन वेळेस पराभव

प्रणिती शिंदे यांच्याकडून लोकसभेची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील मिळू शकते. मात्र, मागील दोन लोकसभा निवडणुकीतील इतिहास पाहिल्यास सुशिलकुमार शिंदे यांचा सलग दोन वेळेस पराभव झाला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सुशिलकुमार शिंदे यांचा 2014 मध्ये नवख्या असलेल्या शरद बनसोडे यांनी पराभव केला. शरद बनसोडे यांना मोदी लाटेचा फायदा झाल्याचे बोलले जाते. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही शिंदेंना पराभवाला सामोरे जावे लागले आणि भाजपच्या जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा विजय झाला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Solapur Loksabha : प्रणिती शिंदेंच्या उमेदवारीची चर्चा सुरु असतानाच शरद पवार गटाचा सोलापूर लोकसभेवर दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटीलABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
Embed widget