एक्स्प्लोर
Junnar Leopard Menace: 8 हजार व्होल्टचा करंट निष्प्रभ, राष्ट्रवादीचे नेते सत्यशील शेरकर यांच्या घरात बिबट्याची उडी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात बिबट्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते सत्यशील शेरकर यांच्या घरात बिबट्याने प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी बिबट्याने कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला, ८ हजार डीसी व्होल्ट क्षमतेचे इलेक्ट्रिक फेन्सिंग असूनही बिबट्याला धक्का बसला नाही'. या घटनेमुळे शासनाच्या झटका मशीनच्या प्रभावीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिसरात एकाच वेळी तीन-तीन बिबटे फिरताना दिसत असल्याने त्यांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाढत्या संख्येमुळे आणि मानवी वस्तीत वाढलेल्या वावरामुळे, या बिबट्यांना गुजरातच्या 'वनतारा'सारख्या ठिकाणी कधी स्थलांतरित केले जाईल, असा प्रश्न विचारला जात आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही या समस्येकडे लक्ष वेधले असून, शासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















