एक्स्प्लोर

Solapur News : लाडक्या गाईचं अनोखं डोहाळे जेवण! महिलांनी भरली ओटी अन् गोमातेसोबत खास फोटो सेशन

Baby Shower of Cow : गायीला आपण गोमाता म्हणतो त्याच गाईचे चक्क डोहाळे पुरवित डोहाळ जेवणाचा अनोखा सोहळा करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील एका शेतकऱ्याने केला.

Solapur News : आई होणं ही महिलांच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो. कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचं कोड कौतुक करत असतात. पण करमाळा तालुक्यात एका शेतकऱ्याने लाडक्या गायीचं डोहाळ जेवण (Baby Shower) धूमधडाक्यात केलं आहे. या अनोख्या डोहाळ जेवणाची पंचक्रोशीत चर्चा आहे. गायीला आपण गोमाता म्हणतो त्याच गाईचे चक्क डोहाळे पुरवित डोहाळ जेवणाचा अनोखा सोहळा करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील एका शेतकऱ्याने केला. यानिमित्ताने सगळ्या गावाला जेवण घालून संध्याकाळी भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम

ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे. " हौसेला मोल नसते," म्हणजे जर एखाद्या गोष्टीची हौस करायची असेल तर, खर्च किती होईल याचा विचार केला जात नाही आणी हौस करणारा शेतकरी असेल तर मग तर विचारूच नका. अशाच एक शेटफळ येथील हौशी शेतकरी परमेश्वर गोरख पोळ यांनी चक्क आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्ताने त्यांनी सर्व पाहुणे मंडळींना निमंत्रण पाठवले. तसेच गावातील सर्व महिलांना आपल्या शेतातील गोठ्यावर बोलवून डोहाळे जेवणाचा मोठा जंगी कार्यक्रम साजरा केला.

यावेळी एखाद्या गरोदर महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो, अशाच प्रकारे सर्व रितीरिवाज पार पडले. गोठ्यात मंडप घालण्यात आला, यामध्ये लाईट डेकोरेशन करण्यात आले होते. गायीला सजवून ओवाळण्यात आले. सर्वांचे गायीसोबत फोटो सेशन झाले. गायीला हिरवा चारा पंचपकवानाचे जेवण घालण्यात आले . आलेल्या सर्व पाहुणे मंडळी महिला व ग्रामस्थांनाही जेवणाचा बेत करण्यात आला होता. नंतर गावातील भजनी मंडळींचा भजनाचा कार्यक्रम झाला. गायीच्या या अनोख्या डोहाळ जेवणाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.

ॠणातून काही प्रमाणात उतराई होण्याचा प्रयत्न

परमेश्वर गोरख पोळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, गावातील एका नातेवाईकाने चार-पाच वर्षांपूर्वी गावरान गायीची छोटी कालवड आम्हाला सांभाळण्यासाठी दिली. तिला आम्ही उत्तम प्रकारे सांभाळली. आमच्या सर्व घरादाराला तिचा चांगलाच लळा लागला आहे. आतापर्यंत तिने दोन वेत दिले. दुधही भरपूर देते. आमची गाय फारच गुणवान आ.हे आमच्या घरातील एक सदस्यच बनली आहे. आमच्याकडे ती आल्यापासून आमच्या घरात लक्ष्मी नांदू लागली, अशी आमची श्रद्धा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला देव मानलं आहे. तिचाही सन्मान व्हावा आणि तिच्या ॠणातून काही प्रमाणात उतराई होण्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सElection Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...Raj Thackeray Anand Dighe : राज ठाकरे थोड्याच वेळात ठाण्यात, आनंदाश्रमात स्वागतची जय्यत तयारीEknath Shinde on MNS : मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेत, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
... म्हणून राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतले; नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली 'राज की बात'
खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका
खर्च 60000 अन् कांद्याची पट्टी फक्त 10000 रुपये, मतदान होताच दरात घसरण, बळीराजाला मोठा फटका
भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर
भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर
Embed widget