एक्स्प्लोर

कामाचा ताण...? सहाय्यक पोलीस निरीक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना

Solapur News: सोलापुरात सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे.

Solapur News Updates: सोलापुरात (Solapur News) एका सहाय्यक पोलीस निरीक्षकानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Committed Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंद मळाळे असं आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. आनंद मळाळे यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र कामाचा ताण असल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. मळाळे हे सध्या नांदेड (Nanded News) येथे सेवा बजावत होते. मात्र, मागच्या महिन्यात ते आजारी असल्यामुळे रजा घेऊन सोलापुरातील घरी आले होते.                                  

आज (शनिवारी) पहाटे चारच्या सुमारास ते घराबाहेरील अंगणात गेले. यावेळी आपल्या सर्विस रिवाल्वरमधून डोक्यात गोळी झाडून त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. घटनेच्यावेळी त्यांच्या पत्नी या घरातच होत्या. बाहेर येऊन त्यांनी पहिल्यानंतर आनंद मळाळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त राजू मोरे आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.                                      

मूळचे धाराशिव जिल्ह्यातील आनंद मळाळे हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयमध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा तसेच, सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी सेवा बजावली. त्यानंतर पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती. मृत आनंद मळाळे यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे. मळाळे यांच्या मृत्यूची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.             

महत्त्वाच्या इतर बातम्या :                         

Manoj Jarange : जातीशी गद्दारी करणं माझ्या रक्तात नाही, शेवटपर्यंत राजकारणात जाणार नाही, मनोज जरांगेंकडून भूमिका स्पष्ट 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget