Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची? 1 कोटी 90 लाख रुपयांची पांढऱ्या रंगाची डिफेंडर कार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाली आहे.

Manoj Jarange Patil Defender Car: मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे जातील त्याठिकाणी त्यांचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करुन किंवा अशाच भव्यदिव्य पद्धतीने त्यांचे स्वागत केले जात आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या या दौऱ्यात आणखी एक गोष्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ती म्हणजे मनोज जरांगे प्रवासासाठी वापरत असलेली अलिशान डिफेंडर कार. ही डिफेंडर कार (Defender Car) सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावरुन बरीच चर्चा होऊ लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही डिफेंडर कार ही माझी नसून मराठा समाजातील एका व्यक्तीने मला ती वापरायला दिल्याचे सांगितले. या डिफेंडर कारचे मालक सुभाष भोसले यांनीही 'एबीपी माझा'शी संवाद साधत आपणच जरांगे पाटलांना ही कार वापरायला दिल्याचे सांगितले. (Maratha Reservation)
नवीन गाडी घेतल्यावर आपण देवाला जातो. मनोज जरांगे हा मराठा समाजाचा देवच आहे. आमच्या समाजासाठी त्यांनी देवापेक्षाही मोठं काम केले आहे. ते माझ्या गाडीत बसावेत, अशी माझी इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या मागे लागलो आणि गाडी त्यांना दिली, असे सुभाष भोसले यांनी सांगितले. मराठा समाजासाठी आंदोलने आणि उपोषणे करून मनोज दादांची तब्येत खूप खालावली आहे. त्यातच पुन्हा ते पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचे समजल्यावर मी डिफेंडर ही गाडी विकत घेतली होती. या गाडीत पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी बसावे ही आपली इच्छा असल्याने पंढरपूर येथील सरकोलीच्या सभेनंतर आपण त्यांना ही गाडी वापरण्यासाठी दिली. वास्तविक या गाडीत असणाऱ्या सुविधांमुळे मनोज जरांगे यांचा प्रवासातील त्रास कमी व्हावा ही आपली भावना होती, असे भोसले यांनी सांगितले.
Defender Car Price: डिफेंडर कारची किंमत आहे तरी किती?
या डिफेंडर कारची किंमत 1 कोटी 90 लाख रुपये असून यासाठी दीड कोटी रुपये कर्ज घेतल्याचे सुभाष भोसले यांनी सांगितले. गाडीवर अनेक लोक चढतील-उतरतील आणि त्यामुळे तिची अवस्था खराब होऊ शकते, याची जाणीव असूनही त्याबद्दल आपल्याला काहीही वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मला व्यवसायामुळे समाजासाठी तेवढा वेळ देता येत नाही. त्यामुळे समाजासाठी झटणाऱ्या माणसाला फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून मदत करावी, या भावनेतून हे केलं, असे सुभाष भोसले यांनी सांगितले. ते सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील असून त्यांचा सराफाचा व्यवसाय आणि शेती आहे. त्यांची सुमारे 10 एकर ऊसाची शेती आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
Before You Go
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही






















