एक्स्प्लोर

दबाव टाकणाऱ्यांची कागदपत्रं मला द्या, त्यांचा बंदोबस्त करतो; शरद पवारांचा रोख नेमका कोणाकडं?

शेतकऱ्यांच्या (Farmers) नावावर कर्ज उचलणाऱ्यांची, तसेच दबाव टाकणाऱ्यांची कागदपत्रं मला द्या, त्यांचा बंदोबस्त मी करतो असा इशारा राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला.

Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या (Farmers) नावावर कर्ज उचलणाऱ्यांची, तसेच दबाव टाकणाऱ्यांची कागदपत्रं मला द्या, त्यांचा बंदोबस्त मी करतो असा इशारा राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला. राजकीय नेत्यांकडून जर शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर त्यांना नेता म्हणून घेण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे शरद पवार म्हणाले. अनेक कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबतच मुद्दा संजय पाटील घाटणेकर यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना शरद पवार यांनी कारखानदारांना थेट इशारा दिला. माढा (Madha) तालुक्यातील कापसेवाडीत कृषी निष्ठ परिवाराचे प्रमुख नितीन कापसे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी  शरद पवार आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. 

साखर कारखानदारांनी काढली शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर अनेक साखर कारखान्यांनी कर्ज काढल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळं शेतकरी चिंतेत आहे. कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता ही कर्ज काढण्यात आल्याचा मुद्दा संजय पाटील घाटणेकर यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या मुद्यावर बोलताना शरद पवार यांनी माढा तालुक्यातील साखर कारखानदारांनी इशारा दिला. शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढणाऱ्या नेत्यांची यादी मला द्या, त्याचा मी बंदोबस्त करतो असे शरद पवार म्हणाले. मात्र, शरद पवारांचा रोख नेमका कणाकडं? याची राजकीय वर्तुळात चर्चा सरु झाली आहे. 

दबाव संपवण्याचा विचार आम्ही करु

अलिकडच्या काळात काही राजकारणी त्यांच्या मनासारखे काम केलं नाही की दबाव आणतात. आज चांगलं काम करणाऱ्याला, त्या कामापासून वेगळं करण्याचे प्रयत्न होत आहेत. शेतकऱ्यांसाठी जे काम करतायेत त्यांच्यावर जर दबाव आणण्याचे काम करत असेल तर तो दबाव संपवण्याचा विचार आम्ही करु, तुम्ही त्याचा विचार करु नका असा इशाराही शरद पवार यांनी दिला. दुधाचा व्यवसाय असेल, द्राक्षाची शेती असेल किंवा डाळिंबाची शेती असेल या सगळ्या गोष्टीत शेतकरी चांगले कष्ट करत आहेत. शेतीच्या प्रश्नावर आपण बसून चर्चा करु असे शरद पवार म्हणाले. 

आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे कार्यक्रमाला उपस्थित 

अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार बबनदादा शिंदे हे अजित पवार गटात सामील झाले आहेत. त्यानंतर प्रथमच शरद पवार हे माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात आमदार बबनदादा शिंदे हे उपस्थित नव्हते, मात्र, त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते.  

महत्त्वाच्या बातम्या:

सध्या मी कुठंच नसलो तरी काळजी करु नका... मी सगळीकडे! पवारांची गुगली, राजकीय चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 13 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaPriyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषणABP Majha Headlines : 03 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Embed widget