एक्स्प्लोर

Vijaydurg Fort : कोकणातील 820 वर्षाचा विजयदुर्ग किल्ला ढासळतोय, पाण्याखाली जाण्याची शिवप्रेमींना भीती 

Sindhudurg, Vijaydurg Fort : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याची गेले काही वर्षे बुरुज ढासळत आहेत.

Sindhudurg, Vijaydurg Fort : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याची गेले काही वर्षे बुरुज ढासळत आहेत. 14 ऑगस्ट रोजी विजयदुर्ग किल्ल्याचा दर्या बुरुजाच्या समुद्राकडील खालील बाजूची तटबंदी सतत होत लाटांच्या मारांमुळे ढासळली आहे. विजयुदर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच त्याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

विजयदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला म्हणजेच समुद्राकडील बाजूला दर्या बुरुज तटबंदी 14 ऑगस्टला समुद्राच्या लाटांमुळे ढासळली. ही ढासळलेली तटबंदी मच्छीमारांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. त्यामुळे तटबंदी ढासळली हे समोर आलं. तटबंदीचा काहिसा भाग खालून कोसळला असून समुद्राच्या लाटांमुळे भविष्यात संपूर्ण तटबंदी ढासळण्याचा धोका उदभवू शकतो. विजयुदुर्ग किल्ला हा एक एैतिहासिक किल्ला असून या किल्ल्यावरती दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र सतत होणारी पडझड पाहता भविष्यात या किल्ल्याचं नाव असेल. मात्र प्रत्यक्षात किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती किल्ल्याप्रेमींनी व्यक्त करत आहेत.

दोन वर्षापुर्वी विजयदुर्ग किल्ल्याच्या तुटक्या बुरजा जवळील तटबंदी ढासळलेली होती. यावेळी अनेक राजकीय लोकांनी व लोकप्रतिनिधींची पाहणी करुन सदर किल्ल्याची डागडुजी केली जाईल, असे आश्वासन देखील दिले होते. मात्र या किल्ल्याची पाहणी करायला आलेले लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी कोणताही आवाज उठविला नसल्याने आजपर्यंत त्या बुरुजाची डागडुजी केलेली नाही. माजी खासदार संभाजीराजे यांनीही विजयदुर्ग किल्ल्याची दोन वर्षापुर्वी तटबंदी ढासळली त्यावेळी प्रत्यक्ष येवून पाहणी केली होती.

विजयदुर्ग किल्ल्यावर 1653 पासून 1818 पर्यंत मराठ्यांचे वर्चस्व होते. विजयदुर्ग किल्ला 820 वर्ष प्राचीन आहे. हा किल्ला इ. स. 1193 ते 1206 मध्ये राजा भोज यांनी बांधला. कारण त्यावेळी राजा भोज यांचे कोकण प्रांतावर वर्चस्व होते. या किल्ल्यावर विजयनगराचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाने राज्य केले. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला आदिलशहाकडून आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी विजयदुर्ग किल्ल्याला पूर्वीच्या काळी घेरीया या नावाने ओळखले जायचे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकण्याच्या अगोदर पाच एकरच्या क्षेत्रफळा मध्ये वसलेला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला तटबंदी वाढवून या किल्ल्याचे क्षेत्रफळ 17 एकर केले. सध्या 17 एकरवर किल्ल्या आहे, मात्र त्याची पडझड होत आहे. 

विजयदुर्ग  किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन आहे. जमिनीवरून किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो. 30 मीटर उंच खडकावर या किल्ल्याची तटबंदीची भींत 300 फूट उंच आहे. किल्ल्याची भींत ही 10 मीटर उंच आहे. समुद्राच्या जवळची तटबंदी म्हणजे पडकोट खुश्की, दुसरी तटबंदी बुराजांच्या भोवती आणि तिसरी तटबंदी किल्ल्याच्या भोवती आहे. अश्या तीन तटबंदी या किल्ल्याला आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
आंबोलीमध्ये पेशानं डॉक्टर असणारा पर्यटक 400 फूट खोल दरीत कोसळला, मृतदेह बाहेर काढण्यात यश
आंबोलीमध्ये पेशानं डॉक्टर असणारा पर्यटक 400 फूट खोल दरीत कोसळला, मृतदेह बाहेर काढण्यात यश
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
तुकाराम मुंढे कायद्याचे पालन करतायेत, प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांमुळेच महाराष्ट्र प्रगतशील : नितेश राणे
तुकाराम मुंढे कायद्याचे पालन करतायेत, प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांमुळेच महाराष्ट्र प्रगतशील : नितेश राणे

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
Embed widget