(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindhudurg News: सिंधुदुर्गमध्ये भाजप-शिवसेनेत राजकीय शिमगा, राजन तेली आणि मंत्री दीपक केसरकर आमनेसामने
Sindhudurg: सिंधुदुर्गच्या या भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीत दिलजमाई होते की यापुढे राजकीय शिमगा होतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
सिंधुदुर्ग: राज्यात सध्या भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची (Shivsena) सत्ता आहे. मात्र असं असलं तरीही हे दोन्ही पक्ष सावंतवाडी मतदारसंघात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यात किंवा सिंधुदुर्गात कोणत्याही निवडणुका (Sindhudurga) डोळ्यासमोर नसतानाही तळकोकणात राजकीय शिमगा पाहायला मिळत आहे. सावंतवाडीत झालेल्या भाजपच्या विजयी मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दीपक केसरकर यांचं नाव न घेता त्यांनी आणलेले प्रकल्प चोरीला गेले अशी पोलिसात तक्रार देऊ म्हणत त्यांचं अपयश दाखवण्याचा प्रयत्न केला. तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपच्या पालकमंत्र्यांनाच टार्गेट केलंय.
भाजप कार्यकर्त्यांना आवरलं नाही तर देवेंद्र फडणवीस यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद घ्यावं लागेल असा इशारा केसरकरांनी दिलाय. तर दोघांनीही एकत्रित बसून मार्ग काढला पाहिजे असा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या या भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीत दिलजमाई होते की यापुढे राजकीय शिमगा होतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र सिंधुदुर्गात कोणत्याही निवडणूका डोळ्यासमोर नसतानाही राजकीय शिमगा पाहायला मिळत आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर दोघांनाही एकत्रित बसून मार्ग काढला पाहिजे असं म्हटल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षमपणे हाताळतील मात्र आता आमदार कोण आहेत हे महत्त्वाचं. युतीत धुसपुस करून विरोधकांना बळ मिळण्याच काम आपण करत नाही ना हे पाहावं. त्यामुळे दोघांनीही बसून यावर मार्ग काढला पाहिजे.
पालकमंत्री उदय सामंत यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
रिफायनरी विरोधात स्थानिक आक्रमक झाल्यानंतर आज पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहेत. बाहेरून लोक आणून आंदोलन करण्यात आल्याची शक्यता उदय सामतांनी व्यक्त केली होती. तसेच कोणत्याही गैरसमजाला, पक्षीय राजकारणाला बळी पडू नका, 'विरोधकांनी कुणाच्याही भावनेला हात घालून राजकारण करू नये, असे आवाहन उदय सामंतांनी केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :