(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकदम फिल्मी! पैशासाठी तरुणाचे सिंधुदुर्गत अपहरण, पोलिसांनी रिक्षाच्या मागे लिहलेल्या नावावरून लावला छडा
कणकवली - समर्थनगर येथे जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाचे अपहरण करत त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना सिंधुदुर्गात घडली आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (Sindhudurg News) जिल्ह्यातील कणकवली- पटवर्धन चौकात मोटरसायकल बंद पडल्याने भाड्याची रिक्षा करून कणकवली - समर्थनगर येथे जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाचे अपहरण करत त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना सिंधुदुर्गात घडली आहे. पटवर्धन चौकात मोटरसायकल बंद पडल्याने भाड्याची रिक्षा करून समर्थनगर येथे जाण्यासाठी निघालेल्या धीरेंद्रकुमार श्रीकांत यादव याला समर्थनगर येथे न सोडता त्याचे अपहरण केले. त्यानंतर बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल बळजबरीने काढून घेतले.
धीरेंद्रकुमार यांनी मोटरसायकल बंद पडल्याने भाड्याची रिक्षा केली. मात्र रिक्षावाल्याने धीरेंद्रकुमार श्रीकांत यादव यांना समर्थनगर येथे न सोडता त्याचे अपहरण करत त्याला मारहाण केली. त्याच्या एटीएममधील 18 हजाराची रोख रक्कम आणि 20 हजाराचा बळजबरीने काढून घेतला आणि फरार झाले. धीरेंद्रकुमारने ही माहिती पोलिसांना दिली आणि पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद
समोर आलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक अल्ताफ अख्तर व रिक्षेत आधीच बसलेला त्याचा सहकारी सुहास घोगळे यांनी धीरेंद्रकुमार याला समर्थनगरकडे न नेता गोव्याच्या दिशेने घेऊन गेले. गोवा बॉर्डरपर्यंत नेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी कुडाळात आणले. त्याच्याकडील एटीएम कार्ड घेत पासवर्ड घेऊन 18 हजार रुपये एटीएममधून काढून घेतले. तसेच धीरेंद्रकुमारचा 20 हजारचा मोबाईल हिसकावून घेत त्याला कुडाळ एसटी बस स्टँड येथे सोडून दिले. त्यानंतर धीरेंद्रकुमार याने कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल हाडळ, राजेंद्र गाडेकर, शरद देठे, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, पांडुरंग पांढरे यांनी कणकवलीतील सीसीटीव्ही फुटेज चेक केले.
रिक्षाच्या नंबरवरून पोलिसांनी लावला छडा
एटीएममध्ये संशयितांनी धीरेंद्र कुमार याचे कार्ड वापरत पैसे काढले होते. ते एटीएम शोधले आणि एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रिक्षाचा नंबर आणि रिक्षाच्या मागे लिहिलेले नाव दिसले. त्यावरून पोलिसांनी रिक्षाचा मालक शोधला. अल्ताफचा शोध घेत त्याला घरातून ताब्यात घेतले, त्यानंतर दुसराही पोलिसांच्या हाती लागला. त्या दोन्ही संशयितांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.
हे ही वाचा :