एक्स्प्लोर

Mumbai : वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने सामने, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, पोलिसांच्या सतर्कतेनं स्थिती निंयत्रणात

Eknath Shinde Aaditya Thackeray : नारळी पौर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे वरळीत आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई : नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे वरळीत आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं.  यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. वरळीच्या कोळीवाड्यात दोन्ही  सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बाजूला करण्याचं काम करण्यात आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे देखील यावेळी उपस्थित होते. 

वरळीतील कोळीवाड्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळाली. या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना  वेगळं करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी मध्यस्थी करत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांना जाण्यासाठी मार्ग करुन दिला. या पाच मिनिटाच्या काळात कार्यकर्ते आक्रमक झाले. एकनाथ शिंदे तिथून जात असताना आदित्य ठाकरे त्यांच्याकडे पाहत होते, अशी माहिती आहे. एकनाथ शिंदे परतीच्या मार्गानं गेले तर आदित्य ठाकरे समुद्राच्या बाजूनं पुढं गेलं. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. अरुंद गल्लीतून दोन्ही नेते पास होत असताना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यानं मोठी घटना घडला नाही. 

एकनाथ शिंदे समुद्राच्या बाजूनं येऊन निघून गेले आहेत. आदित्य ठाकरे आता समुद्राच्या दिशेने गेलं आहेत. हे सगळं होत असताना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते यावेळी तिथं होते. एकनाथ शिंदे पास होत असताना आदित्य ठाकरे नाक्यावर थांबलेले दिसून येत आहे. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना वेगळं करण्यात पोलिसांना यश मिळालं. आदित्य ठाकरेंसोबत दादर माहीमचे आमदार महेश सावंत, आमदार सुनील शिंदे देखील होते. 

वरळी हा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात येऊन एकनाथ शिंदे कोळीबांधवांना भेटले आहेत. दोन्ही नेत्यांचं स्वागत ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं.  या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या ठिकाणी नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांमध्ये उत्साह असल्याचं दिसून आलं.  एकनाथ शिंदे वरळीच्या कोळीवाड्यात येत त्यांनी कोळी बांधवांसोबत संवाद साधला.

आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघाचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे कोळीवाड्यात आले होते, त्यांच्यासोबत देखील कोळी बांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं नेत्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
बेस्टच्या स्थापना दिनीच बसचा अपघात, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, मुलुंडमधील चेक नाका परिसरात घडली घटना
Devendra Fadnavis : राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget