Konkan Railway Disrupts : कोकण कन्या एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं, कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं, प्रवाशांचे हाल
Konkan Railway Disrupts : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक कोडमडलं आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे कोकण कन्या एक्स्प्रेस कोकिसरे ते वैभववाडी रेल्वे स्टेशनदरम्यान बंद पडली आहे.
Konkan Railway Disrupts : कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक कोडमडलं आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मडगाव ते मुंबई धावणारी कोकण कन्या एक्स्प्रेस (Konkan Kanya Express) कोकिसरे ते वैभववाडी रेल्वे स्टेशनदरम्यान बंद पडली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास विस्कळीत झाली आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत.
आज सकाळी आठच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. कोकण कन्या एक्स्प्रेस (Konkan Kanya Express) मुंबईहून गोव्याकडे जात असताना कोकिसरे रेल्वे फाटकापासून काही अंतरावर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन बंद पडली. आता राजापूर स्टेशनवरुन नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले असून इंजिन बदलण्याचं काम सुरु आहे.
इंजिनामधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी अजूनही अर्धा ते एक तास लागणार असल्याची माहिती कोकण रेल्वे (Konkan Railway) प्रशासनाने दिली आहे. इंजिन बिघाडामुळे कोकण कन्या एक्स्प्रेस बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत झालं असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
Indian Konkan Railway : 12 दिवसांपूर्वीही कोकण रेल्वे एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची मागील 12 दिवसातील ही दुसरी घटना आहे. 25 नोव्हेंबर रोजी कोकण कन्या एक्स्प्रेसच्याच इंजिनात बिघाड झाल्याने तब्बल पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. पण अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलं. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली. पण यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता.
Indian Konkan Railway : कोकण कन्या एक्स्प्रेस आता 'सुपरफास्ट'
कोकण रेल्वेच्या मार्गावरुन धावणाऱ्या गाड्यांपैकी मुंबई-मडगावदरम्यान धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस ही चाकरमानी आणि कोकणी प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. रात्रीच्या वेळी निघणारी ही गाडी आरामदायक प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कोकण कन्या एक्स्प्रेसचं आरक्षण नेहमीच फुल्ल असतं. दरम्यान, कोकणी चाकरमान्यांची लाडकी असलेली कोकणकन्या एक्स्प्रेस आता सुपरफास्ट झाली आहे. सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोकण कन्या एक्स्प्रेसच्या वेळपत्रक आणि गाडीच्या क्रमांकामध्ये बदल केला आहे. 20 सप्टेंबरपासून हा बदल लागू झाला.
संबंधित बातम्या
इंजिनात बिघाड झालेली ट्रेन तब्बल पाच तासांनी मार्गस्थ, पण कोकण रेल्वेची वाहतूक अद्याप उशिरानंच