एक्स्प्लोर

Kokan News: तळकोकणात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून शह काटशहाचे राजकारण

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा कार्यक्रम कुडाळ मतदारसंघात घेण्याच्या सूचना केल्यामुळे या कार्यक्रमाची जागा ऐनवेळी बदलण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 जून ला सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावंतवाडी येथे संत गाडगेबाबा मंडई आणि इतर भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर कुडाळमध्ये शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली.मात्र हा कार्यक्रम सावंतवाडी मतदारसंघात नियोजित असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आग्रहामुळे कुडाळ येथे घेण्याचे नियोजन करण्यात आला. यावरूनच आता भाजप आणि शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी समोर येत आहे.

दिपक केसरकर यांनी आपल्या सावंतवाडी मतदारसंघात या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन केले होते. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा कार्यक्रम कुडाळ मतदारसंघात घेण्याच्या सूचना केल्यामुळे या कार्यक्रमाची जागा ऐनवेळी बदलण्यात आली आहे.  यावरूनच आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे. भाजप पुढे शिंदेगट नमला त्यामुळेच दिपक केसरकर यांचा विरोध डावलून नारायण राणेंनी आपल्या मुलाला पुढे आणण्यासाठी दिपक केसरकर यांना शह दिल्याची टीका वैभव नाईक यांनी केली. 

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचा शब्द अंतिम

दिपक केसरकर यांनी यावर सारवासारव करताना नारायण राणे हे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांची इच्छा असेल तर जरूर आपण हा कुडाळला कार्यक्रम घेऊ. मात्र दोन कार्यक्रम घेण्याऐवजी एकच कार्यक्रम घेऊ त्यामुळे आपली एकी दिसेल अशी सारवासारव दिपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचा शब्द अंतिम असल्याचं दिसून येतय.

आमदारांना ताकद देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे  शासन आपल्या दारी या अभियानाचा जिल्हास्तरीय प्रारंभ करण्याच्या दृष्टीने सध्या जोरदार हालचाली सुरू  आहेत. राज्यात मुख्यमंत्री शिंदेंबरोबर ठाकरे सोडून गेलेले आमदार ज्या-ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. राजकीय बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना ताकद देण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे. 

वैभव नाईक यांना शह देण्याकरता कुडाळमध्ये

शिंदे गटाचे आमदार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील 'शासन आपल्या दारी' या नियोजित जिल्हास्तरीय अभियानाच्या शुभारंभाचा कार्यक्रम राणेंनी आपले राजकीय वजन वापरून आमदार वैभव नाईक यांना शह देण्याकरता कुडाळमध्ये घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray :   तू खाली का बसलीस? सभा थांबवून सावरकरांच्या नातीला मंचावर बोलावलं ABP MAJHATop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
×
Embed widget