Horoscope: दिवाळीनंतर ‘या’ राशींना अच्छे दिन; शनिच्या कृपेने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
Horoscope: ग्रह बदलांमुळे 'या' राशीच्या लोकांच्या जीवनात धनलाभाची शक्यता निर्माण होत आहे. दिवाळीनंतर भाग्य उजळणार आहे.
![Horoscope: दिवाळीनंतर ‘या’ राशींना अच्छे दिन; शनिच्या कृपेने होऊ शकतो प्रचंड धनलाभ shani margi 2023 Horoscope november 2023 After Diwali The Days Of These Zodiac Signs Will Start With The Grace Of Saturn One Can Get Huge Money Horoscope: दिवाळीनंतर ‘या’ राशींना अच्छे दिन; शनिच्या कृपेने होऊ शकतो प्रचंड धनलाभ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/a207e16cc8053fb1742c84af66b0c7eb1696955938959557_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Margi 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक काळानंतर मार्गी आणि वक्री होतात, ज्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि यासह पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता दिवाळीनंतर गुरु आणि शनी मार्गी होणार आहेत, ज्यामध्ये 4 नोव्हेंबरला शनि (Shani) मार्गी होणार आहे, तर 31 डिसेंबरला गुरु मार्गी होणार आहे. या राशी परिवर्तनामुळे 3 राशींच्या लोकांचं नशीब उजळू शकतं. तसंच, या लोकांना प्रचंड धनलाभ होऊ शकतो. या भाग्यवान राशींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मेष रास
शनि आणि गुरू मार्गी होणं मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या स्थानी शनिदेव, तर लग्न स्थानी गुरू मार्गी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तसंच कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला प्रंचड फायदा मिळू शकतो. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. शनि मार्गी झाल्यावर तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते. तसंच या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते. तुमच्या कुटुंबाची भरभराट होईल.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शनि मार्गी होणं अनुकूल ठरू शकतं. कारण शनी तुमच्या राशीतून भाग्य स्थानी मार्गी होणार आहे, तर गुरू थेट 11 व्या स्थानी मार्गी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं आर्थिक उत्पन्न वाढू शकतं. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामंही या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित नवीन काम सुरू केल्यास काही दिवसांत यांचे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. तसंच, या काळात तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅम बनवू शकता.
सिंह रास
सिंह राशीसाठी गुरु आणि शनी यांचं मार्गी होणं शुभ सिद्ध होऊ शकतं. कारण शनि तुमच्या राशीच्या सातव्या स्थानी, तर गुरु तुमच्या राशीतून थेट नवव्या स्थानी मार्गी होणार आहे. त्यामुळे या काळात प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढून तुमचा जोडीदाराशी संवाद वाढू शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तसंच तुम्हाला व्यावसायिक भागीदारीच्या कामातही यश मिळू शकतं. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने इतर शहरात प्रवास करू शकता. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो आणि गुंतवणुकीतही तुम्हाला आर्थिक नफा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)