एक्स्प्लोर

Satara : सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरण; अंबादास दानवेंनी भाजपच्या रणजित निंबाळकरांचं नाव घेतलं, चुकीची कामं करत असल्याचा आरोप

Satara Doctor Suicide : डॉक्टर महिलेने तिच्या सुसाईड नोटमध्ये खासदारांच्या पीएनी आपल्यावर चुकीचं काम करण्यासाठी दबाव आणल्याचं म्हटलं होतं. त्यावरून अंबादास दानवे यांनी आरोप केले आहेत. 

मुंबई : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात (Satara Doctor Suicide) ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माजी खासदार रणजित निबाळकर (Ranjit Nimbalkar), त्यांचा भाऊ आणि अजितदादांचा आमदार सचिन कांबळे यांच्यावर आरोप केले आहेत.  हे तिघे मिळून तिथली यंत्रणा चालवतात, चुकीची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. तसेच महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकावरदेखील त्यांनी आरोप केला. 

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने महाराष्ट्र हादरला आहे. आपल्यावर सातत्याने बलात्कार करण्यात आला, चुकीचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी वरिष्ठांचा दबाव आल्याचा आरोप तिने सुसाईड नोटमध्ये केला. तसेच खासदाराच्या दोन पीएंनी दबाव टाकल्याचा आरोपही तिने केला आहे. 

नेमका हाच धागा पकडून ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर, त्यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर, राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्यावर आरोप केले. 

Satara Woman Doctor Suicide : तर तिचा जीव वाचला असता

अंबादास दानवे म्हणाले की, "फलटण आत्महत्या प्रकरणातील युवतीवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव होता. महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाचा त्यामध्ये समावेश आहे. त्याची 15 दिवसांपूर्वी नंदुरबारला बदली झाली आहे. त्याच्याकडे सदर डॉक्टर तरुणीचा तक्रार अर्ज आला होता. मात्र त्याने त्या तक्रारीला केराची टोपली दाखवली. त्याच्यावर तात्काळ निलंबन कारवाई करा. त्याने त्याचवेळी सदर अर्जाची दखल घेतली असती तर आज तिचा जीव वाचला असत." 

Phaltan Doctor Suicide : माजी खासदाराचा भाऊ यंत्रणा चालवतो

माजी खासदाराचा भाऊ अभिजीत निंबाळकर हा त्या ठिकाणी यंत्रणा चालवतो. अधिकाऱ्यावर दबाव टाकणे, त्यांना चुकीची कामे करायला लावणे हे धंदे करतो. त्याला साथ राष्ट्रवादीच्या सचिन कांबळे पाटील या आमदाराची आहे. त्या निंबाळकरच अधिकारांच्या दालनात काय काम असतं? या तिघांवर कारवाई करा. हे तिघे त्याठिकाणी यंत्रणा चालवत होते आणि चुकीची कामे करत होते असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

Phaltan Ranjit Naik Nimbalkar : रणजित निंबाळकरांवर आरोप

सचिन कांबळे पाटील हे अजित पवारांचे आमदार नाहीत, ते नावाला राष्ट्रवादीत आहेत. ते सगळं काम भाजपचं करतात असा आरोप दानवे यांनी केला. ते म्हणाले की, "आमदार सचिन कांबळे पाटील, माजी खासदार रणजित निंबाळकर आणि त्यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर हे अधिकाऱ्यावर दबाव टाकतात आणि चुकीची कामे करायला लावतात. पोस्ट मार्टम सर्टिफिकेट त्यांच्या सोयीने द्या, चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करा, राजकीय कार्यकर्त्यांवर चुकीची कलमे लावा असले उद्योग करत होते."

या तिघांनी वाठार निंबाळकर वाखरी येथे उत्खनन केलेलं नसताना देखील एका शेतकऱ्यावर एक कोटी रुपयांचा बोजा चढवला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न दानवे यांनी विचारला. रणजित निंबाळकरांनी शरद पवारांची राष्ट्रवादी, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि आमच्या शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यावर चुकीच्या प्रकारे गुन्हे दाखल केले आहेत असाही आरोप दानवेंनी केला. 

ही बातमी वाचा:

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast Updates: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर शिर्डीत हाय अलर्ट, Entry Points वर वाहनांची तपासणी तीव्र.
High Alert : Delhi तील स्फोटानंतर मंदिरांची सुरक्षा वाढवली, Ayodhya आणि Shegaon मध्येही अलर्ट
Delhi Blast: दिल्ली स्फोटात Amroha च्या दोन मित्रांचा मृत्यू, Lokesh Agarwal आणि Ashok Kumar ठार
Delhi Blast: स्फोटातील मृतांमध्ये Amroha येथील DTC कंडक्टर Ashok Kumar Gurjar यांचा समावेश
Delhi Blast: दिल्ली स्फोटात Shravasti च्या Dinesh Mishra चा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
'छावा' ते 'सैयारा' 2025 मध्ये 'या' सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; पहिला नंबर कुणाचा?
'छावा' ते 'सैयारा' 2025 मध्ये 'या' सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; पहिला नंबर कुणाचा?
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Embed widget