Satara Kaas Pathar : कास फुलांचा हंगाम 10 सप्टेंबरपासून सुरू, शुक्रवारपासून ऑनलाईन बुकिंग
सातारा जिल्ह्याची (Satara News) शान असलेल्या कास पठाराची आज सातारा जिल्हाधिकारी यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली. येणाऱ्या काही दिवसात हे कास पठार आता फुलांनी बहरु लागणार असल्यामुळे हा दौरा करण्यात आला.
सातारा : जागतिक वारसा स्थळ असणार्या कास पठारावरील (Kaas Pathar) हंगामाची सुरुवात 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं करण्यात येणार असून 9 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंग सुरू होणार असल्याचा निर्णय वनसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. हंगाम पर्यटकांना खुला करण्याच्या हलाचालींना वेग आला असून हंगामाच्या नियोजनाची बैठक बुधवारी पार पडली आहे.
सातारा जिल्ह्याची (Satara News) शान असलेल्या कास पठाराची आज सातारा जिल्हाधिकारी यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली. येणाऱ्या काही दिवसात हे कास पठार आता फुलांनी बहरु लागणार असल्यामुळे हा दौरा करण्यात आला. या दौऱ्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, पर्यटनमंत्र्यांचे स्वीय सहाय्य गौतम पठारे, उपप्रादेशीक परिवहन विभागाचे वरिष्ठ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, परिवहन महामंडळाचे अधिकारी इत्यादी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ट
या दौऱ्यात नेमके कोणते निर्णय झाले?
- येत्या शनिवार 10 तारखेपासून कासचा हंगाम सुरू होणार आहे. येत्या तारखेपासून ऑनलाईन बुकिंग सेवा सुरु होणार
- पर्यटकांना कास परिसरात वाहने घेऊन जाता येणार नाहीत. पुण्याच्या पीएमपीएल विभागामार्फत पर्यटकांसाठी इलेक्ट्रीक बस उपलब्ध होणार आहे
- परिसरातील ग्रामस्थांची या इलेक्ट्रिक बसमध्ये गाईड म्हणून नियुक्ती करणार
- फुलांच्या कास पठाराला संरक्षणाच्या नावाखाली जाळ्या उभारल्या आहेत त्या तात्काळ काढाव्यात
- एमटीडीसी मार्फत दर्जेदार शौचालये उभी केली जाणार
- प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढच्यावर्षी आणखी सुधारणा करणार
- वन्यप्राणी आणि पाळीव प्राणी या परिसरात वावरली पाहिजे
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात उमलणारी फुले ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हळू हळू दिसू लागली असून काही दिवसातच हा संपूर्ण परिसर हा विविध फुलांच्या छटांनी बहरलेला दिसेल आणि या परिसराला पर्यटकांची गर्दी होईल. मात्र तत्पूर्वी या परिसरातील सध्याची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
संबंधित बातम्या :