Satara Crime : जुन्या वादाचा काटा काढला; चौघांकडून तरुणावर धारदार हत्याराने वार, ल्हासुर्णे हादरलं!
युवकावर चौघांनी धारदार शस्त्राने तरुणावर वार केल्यानं सातारा जिल्ह्यातील कारेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे गाव हादरलं आहे. या घटनेुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ल्हासुर्णे, सातारा : राज्यात गुन्हेगारीत प्रचंड प्रमाणात (Crime news) वाढ झाली आहे. त्यातच रोज नव्या घटना समोर येत आहे. अनेक गावागावात दादा, भाई, बॉस फिरताना दिसत आहे. दहशत पसरवण्यासाठी थेट कोयते हल्ले केले जात आहे. यावर पोलीस नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करत असतानाच एका युवकावर चौघांनी धारदार शस्त्राने तरुणावर वार केल्यानं सातारा जिल्ह्यातील कारेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे गाव हादरलं आहे. या घटनेुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत काल रात्री पूर्वीच्या भांडणातून एका युवकावर चौघांनी धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केलं. या प्रकरणी याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. साधारण 11 मार्चला साधारण सव्वानऊच्या दरम्यान चार व्यक्तींनी श्रीतेज मानसिंग जाधव या 24 वर्षीय तरुणाच्या उजव्या कानाच्या पाठीमागे, डोक्यात, मानेशेजारी, हातावर, पाठीवर, गुडघ्यावर सपासप वार केले. काही दिवसांपूर्वी या सगळ्यांचे वाद झाले होते. या वादाचा बदला घेण्यासाठी चौघांनी मिळून श्रीतेजवर वार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
तिघांना अटक, एकाचा शोध सुरु
या प्रकरणी श्रीतेजचे चुलते ज्ञानेश्वर परशुराम जाधव (वय 54) यांनी येथील पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरुन चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संयोग ऊर्फ सोन्या कुंभार, अधिक कुंभार आणि आकाश खताळ यांना अटक केली आहे तर एकाचा पोलीस शोध घेत आहे. श्रीतेजवर सातारा येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
क्षृल्लक कारणावरुन वादावादी अन् हल्ले!
राज्यात सध्या अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. यात तरुण गुन्हेगारांची संख्या जास्त आहे. लहान मोठ्या भांडणावरुन एकमेकांवर थेट हल्ले केल्याच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. साधारण यात 18 ते 25 वर्षांच्या वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. क्षृल्लक कारणावरुन झालेला वाद मनात ठेवून अनेक तरुण कोयत्याने हल्ले करतात. सध्या सगळीकडेच गावातील भाई, दादाचं प्रमाण वाढलं आहे. मात्र या सगळ्यांमुळेच अनेक गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक पालकांना धास्तीदेखील बसली आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना राबवल्या जात आहे. तरीही गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाही आहे. हिच गुन्हेगारी रोखण्याचं पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.
इतर महत्वाची बातमी-