अजित पवार यांच्याकडून नितीनकाकांना राज्यसभेचा शब्द, साताऱ्यात भाजप जिल्हाध्यक्ष अन् फडणवीसांच्या भूमिकेनं नवा ट्विस्ट
Rajya Sabha Election : सातारा लोकसभा निवडणुकीत वाई विधानसभा मतदारसंघातील एका प्रचारसभेत अजित पवार यांनी नितीनकाक पाटील यांना राज्यसभेचा खासदार करण्याचा शब्द दिला होता.
सातारा : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) दोन रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पियूष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभा खासदार झाल्यानं त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांच्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं साताऱ्याची जागा सोडली होती. त्याबदल्यात राज्यसभेची एक जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyasheel Kadam) आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत भूमिका मांडली आहे. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नितीनकाका पाटील (Nitinkaka Patil) यांना दिलेल्या शब्दाची पूर्तता होणार का असा सवाल निर्माण झाला आहे.
उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक जाहीर झालीय. सातारा लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आणि सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांना राज्यसभेचा खासदार करण्याचा शब्ददिला होता.लोकसभा निवडणुकीदरम्यान वाई शहरांमध्ये झालेल्या अजित पवार यांच्या जाहीर सभेमध्ये अजित पवार यांनी सुद्धा नितीन पाटील यांच्या राज्यसभेच्या मागणीबाबत ग्रीन सिग्नल दिला होता.
आज झालेल्या भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये भाजपची राज्यसभा ही भाजपकडेच राहावी, अशी मागणी केली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी आमचे पार्लमेंटरी बोर्ड योग्य तो निर्णय घेईल असे सांगून सातारच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर असलेला ट्विस्ट आणखी वाढल्याचे आता पाहिला मिळत आहे.
अजित पवार यांनी नितीनकाका कोणता शब्द दिलेला?
सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेत अजित पवार यांनी नितीनकाका पाटील यांना राज्यसभेचं खासदार करण्याचा शब्द दिला होता. अजित पवार म्हणाले, वाई विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघातून लाख मताचं मताधिक्क्य द्या, कारण आता समोर आता कुणी नाहीच, जे आहेत ते कमळाचं काम करतात, ज्यांचं आपलं जमत नाही ते कमळाचं काम करतात. तुम्ही ते काम करुन दाखवा, मी नाही जूनमध्ये नितीनकाकाला खासदार केला तर पवारांची औलाद सांगणार नाही, माझ्यावर सोपवा हो, तुम्हाला एकही काही न करता तुम्हाला एक जोडीला खासदार देतो. उदयनराजे आपली काम करतीलच तर नितीनकाका आहेत ना आपली कामं करण्यासाठी सारखं नितीनकाकाच्या मागं भुंगा लावायचा, असं अजित पवार म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
Shivendraraje Bhosale Speech : देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण मिळवून देवू शकतात - शिवेंद्रराजे भोसले