एक्स्प्लोर

मोठी बातमी :राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या भिरकावल्या, सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु, ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेचा इशारा

Raj Thackeray : राज ठाकरे सुपारीबाज आहेत असं म्हणत बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर सुपाऱ्या फेकल्या.

बीड : गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण आंदोलनानं धुमसत असलेल्या मराठवाड्यात राज ठाकरेंचा (Raj Thackeray Marathwada Visit)  दौरा सुरू आहे. राज ठाकरे आता बीडमध्ये दाखल झालेत. पण तिथे त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Uddhav Thackeray)  कार्यकर्त्यांनी केला. राज ठाकरे सुपारीबाज आहेत असं म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर सुपाऱ्या फेकल्या. पोलिसांनी त्यांना आवरलं आणि राज यांच्या ताफ्याला वाट करून दिली. या गोंधळानंतर मनसने इशारावजा धमकी  दिली आहे.  

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हिडीओ शेअर करत ताफा अडवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे.  संदीप देशपांडे म्हणाले, उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगत आहे, सुरूवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार आहे. 

ठाकरे गटाने ताफा का अडवला?

राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत चुकीची भूमिका घेतली, आरक्षणाविरोधात बोललेलं आम्ही सहन करणार नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. आतापर्यंत मराठवाड्यात मराठा आंदोलकांच्या रोषाला राज ठाकरेंना सामोरं जावं लागत होतं. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलन केलं. एकीकडे हा विरोध असताना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मात्र राज ठाकरेंचं जंगी स्वागत होतंय.  

बीडमधील मनसे कार्यकर्त्यांचे काय म्हणणे?

राज ठाकरे यांचे बीड शहरामध्ये आगमन झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता.  मात्र केवळ राजकीय विरोधातून हा प्रयत्न झाला आहे.  याचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. मनसे शहराध्यक्ष करण लोंढे आणि शैलेश जाधव या दोघांनी आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे काही काळ मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांचे शर्ट सुद्धा फाटले आहे. 

राज ठाकरे यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा 

राज ठाकरे यांनी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे यांना हॉटेलमध्ये बोलावून घेत ही घटना घडण्यापूर्वी आपले इंटेलिजन्स नव्हते का? असा सवाल केला.  अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको होती, भविष्यात असे प्रकार होऊ नये असेही राज ठाकरे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना सांगितले. 

 Video : सुरुवात तुम्ही केली आहे शेवटी आम्ही करणार, ठाकरे गटाला इशारा

हे ही वाचा :

Video: बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवून गाडीवर सुपाऱ्या भिरकावल्या, मराठा आंदोलक अन् ठाकरेंच्या शिवसैनिक आक्रमक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Tafa Car Accident | केजमध्ये शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात ABP MajhaMaharashtra Portfolio Allocation | महायुतीचं खातेवाटप जाहीर, चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल ABP MajhaDeepak Kesarkar VS Aaditya Thackeray | शालेय गणवेशावरून आदित्य ठाकरे- केसरकरांमध्ये जुंपली ABP MajhaEVM Mahrashtra Election | EVM चं काठमांडू कनेक्शन? भारत जोडोतील नेत्यांचं काय संबंध? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
Embed widget