Narendra Patil on Satara Loksabha : साताऱ्यात थेट उदयनराजे भोसलेंसमोर नरेंद्र पाटलांची मोठी मागणी! म्हणाले, "मी फडणवीसांना..."
Narendra Patil on Satara Loksabha : उदयनराजे भोसले यांनी कोणत्याही परिस्थितीत सातारची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांनाच तिकिट जाहीर होण्याची शक्यता आहे.
Narendra Patil on Satara Loksabha : सातारा लोकसभेसाठी भाजप राज्यसभा खासदार उदनयनराजे भोसले यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित मानण्यात येत असली, तरी अजूनही त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. दुसरीकडे उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी जाहीर होण्याची वाट न बघता भेटीघाटींचा दौरा सुरूच ठेवला आहे. त्यापूर्वी दिल्लीमध्ये जाऊन उमेदवारीसाठी तळ ठोकला होता. उदयनराजे भोसले यांनी कोणत्याही परिस्थितीत सातारची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांनाच तिकिट जाहीर होण्याची शक्यता आहे.
उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध
मात्र असे असतानाही आजच्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध दिसून आला. यावेळी बोलताना माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा लोकसभेसाठी आजही इच्छुक असल्याची प्रतिक्रिया दिली. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी सुद्धा खोचक शब्दात उदयनराजे भोसले यांना टोला लागावला. त्यामुळे उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत असली तरी महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचा प्रकार या समन्वय बैठकीतून समोर आला.
प्रश्न अजूनही तसेच प्रलंबित
नरेंद्र पाटील यांनी बोलताना सांगितले की, सातारमध्ये भाजप चिन्हावर निवडणूक 2019 मध्ये लढवली गेली. या मात्र त्यापूर्वी महायुतीमध्ये शिवसेना लढत होती. आपण 2019 विसरलो असले तरी 2019 च्या कालखंडातील प्रश्न अजूनही तसेच प्रलंबित असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगत तोफ लागली. उमेदवारांनी विकासाची गंगा लोकांपर्यंत पोहोचण्याचे गरजेचे असल्याचे नरेंद्र पाटील म्हणाले.
लोकांचे संपर्क झाला पाहिजे, मी अजूनही आशावादी असल्याचे नरेंद्र पाटील म्हणाले. दरम्यान, साहेब तुम्ही दिल्लीला गेला आमचा दिल्लीला कोणी नसल्याचेही नरेंद्र पाटील यावेळी यावेळी म्हणाले. मात्र आम्ही फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तोच आमच्यासाठी अंतिम असल्याचेही त्यांना सांगितल्याचे नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांनी एक प्रकारे अजूनही सातारा लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे स्पष्ट केले आहे.
फक्त गाड्यांचा ताब्यात घेऊन फिरून काही उपयोग होणार नाही
दरम्यान यावेळी बोलताना शंभूराज देसाई यांनी सुद्धा उमेदवारी जाहीर नसली तरी सूक्ष्म नियोजन केले पाहिजे,अशी प्रतिक्रिया दिली. बूथ प्लॅनिंग सुद्धा झालं पाहिजे असे शंभूराज देसाई म्हणाले. फक्त गाड्यांचा ताब्यात घेऊन फिरून काही उपयोग होणार नाही, तेच कार्यकर्ते तेच फोटोग्राफ, कॅमेरे असा टोला त्यांनी उदयनराजे यांना लागवला.
उद्याचा उमेदवार उदयनराजे असतील
दरम्यान यावेळी बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र उद्याचा उमेदवार उदयनराजे असतील, असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. दरम्यान एवढे बोलताना त्यांनी शंभुराजे यांच्यावर भाष्य केले ते म्हणाले की पुढील उमेदवार शंभूराजे तुम्हीच असणार आहात असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या