एक्स्प्लोर

सरपंच संतोष देशमुखांचा अमानुष छळ बघावला नाही; मारहाणीचे फोटो पाहून तरुणाचे टोकाचे पाऊल, बीडचं जाणेगाव हादरलं! 

Santosh Deshmukh Death Case: संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो पाहून धक्का बसल्याने जानेगाव येथील रहिवासी असलेल्या 23 वार्षीय तरुणाने धक्क्यातून टोकाचे पाऊल उचलले आहे.

बीड:  जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Death Case) करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आलेत. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळले आहे. या कृत्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असताना संतोष देशमुखांच्यार (Santosh Deshmukh) मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी आता जोर धरतेय. अशातच बीडच्या केज तालुक्यातील जानेगाव येथून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो पाहून धक्का बसल्याने जानेगाव येथील रहिवासी असलेल्या 23 वार्षीय तरुणाने धक्क्यातून टोकाचे पाऊल उचलले आहे. अशोक हरिभाऊ शिंदे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण बीड (Beed) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. 

तर लढाई कशी करायची? धनंजय देशमुख यांचे आवाहन

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील वायरल झालेले फोटो पाहून केज तालुक्यातील जानेगाव येथिल अशोक शिंदे हे प्रचंड विचलित आणि अस्वस्थ झाले होते. त्यांनी या विषयावर गावातील मित्रांसमवेत चर्चा केली. घरी जाऊन येतो असे सांगून ते घरी गेले आणि घरात गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. हत्येच्या निषेधार्थ आणि संतोष भैय्यांच्या आठवणीत काल (4 मार्च) जानेगाव बंद ठेवण्यात आले होत. यावेळी अशोक शिंदे हा गाव बंद करण्यासाठी आग्रही होता. मात्र ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून अशा पद्धतीने कोणीही आत्महत्या टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी केले आहे. तसेच एक एक मावळा या लढाईमध्ये कमी होत असेल तर लढाई कशी करायची? असा प्रश्न ही धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. 

वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषरोपामध्ये आणखी काही खुलासे पुढे आले आहेत. या मुळे वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. एसआयटीला तपासादरम्यान काय काय मिळालं याची माहिती ही एबीपी माझाच्या हाती लागली आहे. यात कराडने आपल्या तीन आयफोनमधील डाटा का डिलीट केला? तो एसआयटीने कसा रिकव्हर केला. हे ही यातून पुढे आले आहे. कराडची महाराष्ट्रभर कोट्यावधीची संपत्तीनंतर एसआयटीला  कराडच्या महागड्या गाड्या जप्त करायचे असल्याची ही माहिती आहे. वाल्मिक कराडकडे किती महागड्या गाड्या आहेत? त्याचा ही तपास केला जाणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सादर केलेल्या दोषारोपपत्रात वाल्मीक कराडकडे महागड्या गाड्या असल्याचे देखील समोर आलय. या गाड्या जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : पण, शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण सरकारला करायची होती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पण, शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण सरकारला करायची होती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्याताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; सुषमा अंधारेंचा संताप
शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्याताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; सुषमा अंधारेंचा संताप
Donald Trump : भारताला कर लावला, पाकिस्तानला थँक्स म्हणाले! ट्रम्प यांच्या तब्बल पावणे दोन तासांच्या भाषणातील 10 मुद्यांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधले
भारताला कर लावला, पाकिस्तानला थँक्स म्हणाले! ट्रम्प यांच्या तब्बल पावणे दोन तासांच्या भाषणातील 10 मुद्यांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधले
Namo Shetkari : पीएम किसानचे 2000 आले, लाडकी बहीणचे 3000 येणार, शेतकरी भावांना नमो शेतकरी महासन्मानचे 2000 कधी मिळणार?
पीएम किसानचे 2000 आले, लाडकी बहीणचे 3000 येणार, शेतकरी भावांना नमो शेतकरीचे 2000 रुपये कधी मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, कोकाटेंच्या शिक्षेला स्थगितीBhaskar Jadhav Mumbai | सरकारचा महाराजांवरील प्रेमाचा बुरखा आज फाटला, भास्कर जाधवांचा संतापJaykumar Gore Photo Controversy : राऊत - वडेट्टीवारांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर, जयकुमार गोरे UNCUTVijay Wadettiwar|अमृत योजना घोटाळा प्रकरण; सचिव सुजाता सौनिक यांचं एकनाथ शिंदेंबाबत कोर्टात एफिडेविट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : पण, शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण सरकारला करायची होती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पण, शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण सरकारला करायची होती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्याताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; सुषमा अंधारेंचा संताप
शिफारशीने मिळालेला आयोग कार्पोरेट पार्ट्यापुरता, भुरट्याताईसुद्धा चकार शब्द काढत नाहीत; सुषमा अंधारेंचा संताप
Donald Trump : भारताला कर लावला, पाकिस्तानला थँक्स म्हणाले! ट्रम्प यांच्या तब्बल पावणे दोन तासांच्या भाषणातील 10 मुद्यांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधले
भारताला कर लावला, पाकिस्तानला थँक्स म्हणाले! ट्रम्प यांच्या तब्बल पावणे दोन तासांच्या भाषणातील 10 मुद्यांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधले
Namo Shetkari : पीएम किसानचे 2000 आले, लाडकी बहीणचे 3000 येणार, शेतकरी भावांना नमो शेतकरी महासन्मानचे 2000 कधी मिळणार?
पीएम किसानचे 2000 आले, लाडकी बहीणचे 3000 येणार, शेतकरी भावांना नमो शेतकरीचे 2000 रुपये कधी मिळणार?
सोलापूरकर आणि कोरटकर यांना  का वाचवताय? ते सरकारचे जावई आहे का? जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल 
सोलापूरकर आणि कोरटकर यांना  का वाचवताय? ते सरकारचे जावई आहे का? जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल 
स्टीव्ह स्मिथचा आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटला अलविदा!
स्टीव्ह स्मिथचा आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटला अलविदा!
DA Hike: होळीपूर्वी केंद्राचे कर्मचारी, पेन्शनधारकांना गिफ्ट मिळणार, महागाई भत्ता वाढीसंदर्भात मोठा निर्णय होणार? 
होळीपूर्वी केंद्राचे कर्मचारी, पेन्शनधारकांना गिफ्ट मिळणार, महागाई भत्ता वाढीसंदर्भात मोठा निर्णय होणार? 
अबू आझमींच्या वक्तव्याचे उत्तर प्रदेशच्या विधानपरिषदेत पडसाद!
अबू आझमींच्या वक्तव्याचे उत्तर प्रदेशच्या विधानपरिषदेत पडसाद!
Embed widget