संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जेरबंद, मात्र वाल्मिक कराडची सगळी यंत्रणा एक पोलीस अधिकारी बघतात; बाळा बांगर यांचा खळबळजनक दावा
Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जेरबंद असले तरी एक पोलीस अधिकारी वाल्मिक कराडची सगळी यंत्रणा बघतात.असा खळबळ जनक दावा सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी केला आहे.

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी जेरबंद असले तरी एक पोलीस अधिकारी वाल्मिक कराडची (Walmik Karad) सगळी यंत्रणा बघतात. इतकच नाही तर तत्कालीन बीड पोलीस (Beed Police) एलसीबीचे पोलीस निरीक्षक त्यांचं काम पाहत आहेत, त्या अधिकाऱ्याचं नाव आम्ही लवकरच सांगू. अधिवेशनात काही लोकप्रतिनिधी या विषयावर बोलणार असून पोलीस यंत्रणेतील लोक अधीक्षकांना चुकीची माहिती देत असून ही संस्थात्मक हत्या आहे. यंत्रणा अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. असा खळबळ जनक दावा सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष झाले. त्याअनुषंगाने बाळा बांगर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
Bala Bangar : शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही देशमुख कुटुंबीयांसोबत आहोत
आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालंय. मात्र केसमध्ये गती दिसत नाही. कृष्णा आंधळे अजून सापडला नाही. त्यामुळे यंत्रणेवर संशय निर्माण होतोय. यंत्रणेवर विश्वास आहे तरीही संशय निर्माण होतोय. देशमुखांचे विचार जिवंत आहेत. 12 डिसेंबरला चार्ज फ्रेम होणार आहे. पुढच्या 9 डिसेंबर पर्यंत आरोपी फाशी जातील, अशी आमची अपेक्षा आहे. आरोपी जेरबंद असला तरी, एक पोलिस अधिकारी वाल्मिकची सगळी यंत्रणा बघतात. तत्कालीन बीड पोलिस LCB चे PI त्याचं काम पाहतायत. त्या अधिकाऱ्यांची नावं आम्ही लवकरच सांगू. अधिवेशनात काही लोकप्रतिनिधी या विषयावर बोलणार आहेत. यंत्रणेतील लोक अधीक्षकांना चुकीची माहिती देतात. ही संस्थात्मक हत्या आहे, यंत्रणा, अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही देशमुख कुटुंबीयांसोबत आहोत. ज्या माणसात हृदय आहे ते या हत्येचं समर्थन करणार नाही. असेही सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर म्हणाले.
Santosh Deshmukh Murder Timeline : संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम
29 नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने अवादा पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची खंडणी मागितली. ती जर दिली नाही तर काम बंद पाडण्याची आणि अधिकाऱ्यांना मारण्याची धमकी दिली.
6 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता वाल्मिक कराडचे साथिदार अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि इतर अनोळखी इसमानी आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला. त्यांनी प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या वॉचमनलाही मारहाण केली.
वॉचमन मस्साजोगचा असल्याने त्याने लगेच सरपंच संतोष देशमुखांना फोन करून बोलावून घेतलं. त्यावेळी संतोष देशमुख आणि त्यांच्या साथिदारांनी वाल्मिक कराड गँगच्या लोकांना तिथून हाकलून लावलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाल्मिक कराडच्या गँगचा संताप झाला. आपली दहशत कायम राहावी यासाठी त्यांनी संतोष देशमुखांना मारहाण करण्याचं ठरवलं.
इतर महत्वाच्या बातम्या























