एक्स्प्लोर

देवेंद्रजी, धस यांना जाब विचारणार की बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? अमोल मिटकरींचा फडणवीसांना थेट सवाल

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी आक्रमक झाली झाली असून आमदार सुरेश धस यांची दखल घेण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

मुंबईदेवेंद्र फडणवीसजी (Devendra Fadnavis) आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात 'क्या हुआ तेरा वादा अजितदादा' अशा प्रकारे वक्तव्य करून आदरणीय अजितदादांविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार, की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार? असा सवाल करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) जाब विचारला आहे. आमदार अमोल मिटकरींनी एक्सवर पोस्ट करत हा प्रश्न विचारला आहे. परिणामी  भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीके नंतर आता राष्ट्रवादी आक्रमक झाली झाली असून आमदार सुरेश धस यांची दखल घेण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे बघायला मिळत आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ (Santosh Deshmukh Case) शनिवारी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे (Parbhani Muk Morcha) आयोजन करण्यात आले होते. या मोर्चातील सभेतून भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. सुरेश धस यांनी अजित पवार यांना घेरताच राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर आमदार अमोल मिटकरींनी एक्सवर पोस्ट करत आमदार सुरेश धसांची एक प्रकारे तक्रार थेट देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. तर दुसरीकडे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत. मग गृह खातं झोपा काढत आहे का? असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी विचारला आहे. 

....तर तुमचा गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? -सुरज चव्हाण

सुरज चव्हाण यांनी 'एक्स' पोस्ट शेअर करत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ. सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. परभणीच्या सभेत अजितदादांना क्या हुआ तेरा वादा... म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णाला माझा प्रश्न आहे. आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत. मग गृह खातं झोपा काढत आहे का? निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? स्व. संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जरी नेता, कार्यकर्ता जर चौकशीत दोषी आढळला तर अजितदादा त्यांच्यावर कार्यवाही करायला गय करणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. 

नेमकं काय म्हणाले होते सुरेश धस?

पद्धतीने यांनी संतोषला मारले ती कोणती पद्धती आहे? छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येप्रमाणेच ही हत्या झाली आहे. त्या लेकराने काय बिघडवले होते? आकाचे आका करलो, जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी, असा जोरदार हल्लाबोल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. तर अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काल (4 जानेवारी) परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या सभेतून सुरेश धस बोलत होते.   

आणखी वाचा 

Suresh Dhas : आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
Embed widget