Sangli Crime : शिंदे गटात का सामील होत नाही? इस्लामपूरमधील शिवसैनिकेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला!
शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार शिंदे यांच्यावर अज्ञात पाच ते सहा जणांनी काठ्या व लोखंडी राँडने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली.

Sangli Crime : इस्लामपूरमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत केली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील होऊन जिल्हाप्रमुख झालेल्या आनंदराव पवार गटाच्या कार्यकर्त्यांने ही मारहाण केल्याची माहिती असून जुन्या वादातून आणि शिंदे गटात का सामील होत नाही? म्हणून मारहाण केल्याची तक्रार शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांनी केली आहे.
शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार शिंदे असं त्यांचे नाव असून यांना आज अज्ञात पाच ते सहा जणांनी काठ्या व लोखंडी राँडने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी सांगली येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिंदे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्याच्या विरोधात 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इस्लामपूर येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार शिंदे यांना आज सकाळी अज्ञात पाच ते सहा जणांनी काठ्या व लोखंडी राँडने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी सांगली येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास येथील हनुमान नगरमध्ये शिंदे यांच्या घरासमोरच मारहाणीची ही घटना घडली आहे. मोरट सायकलवरुन आलेल्या पाच ते सहा जणांनी शिवकुमार शिंदे यांना मारहाण केली. या सर्वांनी तोंड बांधलेले होते. या घटनेनंतर परीसरातील लोकांनी जखमी शिंदे यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे नेण्यात आले.
शिवकुमार शिंदे हे शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती आहेत. प्रभाग 4 मधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व प्रतिभा शिंदे या निवडून आल्या होत्या. सभागृहाचा कार्यकाल संपत आल्यानंतर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. या नामांतरचा ठराव घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या पालिकेच्या सभेस नगरसेविका शिंदे या गैरहजर होत्या. तेव्हापासून त्यांचे शिवसेशी बिनसल्याची चर्चा होती. प्रतिभा शिंदे या सेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी ही आहेत. त्यांच्या पतींना मारहाण झाल्याने शहरात एकच खळखळ माजली आहे.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















